नसते उद्योगच्या मंचावर 'भय'ची टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 09:35 AM2018-03-01T09:35:39+5:302018-03-01T15:05:39+5:30
विशिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत ...
व शिष्ट विनोदांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या झी टॉकीजच्या नसते उद्योग या चॅट शोमध्ये सध्या प्रेक्षक एक चांगला बदल अनुभवत आहेत. उत्तम कॉमेडी आणि मनोरंजन देणारा झी टॉकीजचा कार्यकम नसते उद्योग आता नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नवीन वेळेवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी नसते उद्योगच्या मंचावर अवलिया कलाकार आता नुसते उद्योग करणार आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील मराठी सिनेमाला महत्त्व देऊन त्याला एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी झी टॉकीजने हे अनोखे पाऊल उचलले आहे. मराठी चित्रपटांना घराघरात पोहोचवणारी झी टॉकीज ही वाहिनी आता आगामी मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठीदेखील मोलाचा वाटा उचलत आहे. नसते उद्योग या कार्यक्रमाच्या नवीन रूपरेषेत प्रेक्षकांचे लाडके कलाकार क्रांती रेडकर आणि प्रसाद ओक हे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहेत. तसेच अंशुमन विचारे, नम्रता आवटे, प्रभाकर मोरे हे हास्यसम्राट प्रमोशनसाठी आलेल्या मराठी चित्रपटावर विनोदी स्पूफ सादर करून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.
येत्या रविवारी नसते उद्योगच्या रंगमंचावर भय या सिनेमातील कलाकार येणार आहेत. मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि स्मिता गोंदकर तसेच हँडसम हंक अभिजित खांडकेकर आणि सिद्धार्थ बोडके नसते उद्योगच्या सेटवर धमाल करताना प्रेक्षक पाहू शकणार आहेत. न.स.ते. उद्योग आता नव्या स्वरूपात मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी पुढे सरसावत आहे. प्रेक्षकांना ही संकल्पना आवडली आहे याचा कार्यक्रमाच्या टीमला आनंद होत आहे.
भय या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली असून दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे. अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भय’या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे प्रिमियर नुकतेच दुबई येथे खास दुबई मधील मराठी लोकांसाठी करण्यात आले.
Also Read : दुबईत रंगला ‘भय’ चित्रपटाचा शानदार प्रिमिअर