अन् करणवीर बोहराच्या आईच्या डोळ्यात तरळले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:08 AM2017-09-01T10:08:23+5:302017-09-01T15:38:23+5:30
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतोय.त्यामुळे छोट्या पडद्यावरही ‘रिश्तों का त्योहार’ साजरा होणार आहे. या उत्साहाचे प्रतिबिंब ‘झी ...
ग ेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होतोय.त्यामुळे छोट्या पडद्यावरही ‘रिश्तों का त्योहार’ साजरा होणार आहे. या उत्साहाचे प्रतिबिंब ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट जुडवा’ या आगळ्या लोकप्रिय कार्यक्रमात रसिकांना पाहायला मिळणार आहे.या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करणवीर बोहरा हा स्पर्धकांबरोबर ‘रिश्तों का त्योहार’ साजरा करताना दिसेल. याशिवाय तो अनेक जुळ्य़ा भावंडांबरोबर गणपतीच्या महाआरतीतही सहभागी होईल.या कार्यक्रमात करणवीरची आई मधू बोहरा आणि वडील महेंद्र बोहरा हे स्पर्धकांसाठी हातात गणपतीच्या प्रसादाची थाळी घेऊन सहभागी झाले होते. करणवीरच्या आई-वडिलांनी उपस्थितीने कार्यक्रमाची अधिकच रंगत वाढली होती. यावेळी या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धकही करणवीरच्या लहानपणीच्या आठवणी जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. संकल्प आणि संभव या जुळ्य़ा भावंडांनी त्याच्या पालकांना त्याचे बालपणीच्या काही आठवणी सागण्यासाठी विनंती केली. तेव्हा करणवीरच्या आईने सांगितले की करणवीरचे खरे नाव मनोज असून त्याने पडद्यावरील अभिनयासाठी करणवीर हे नाव नंतर स्वीकारले. मनोजने एकदा वॉचमनकडून पैसे घेतल्याबद्दल त्याच्या वडिलांनी त्याची कशी खरडपट्टी काढली होती, ते त्याच्या आईने सांगितले; तर करणला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.बालगणेशाला सा-या जगाला तीनदा प्रदक्षिणा घालण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने आपले आई-वडील शिव-पार्वती यांनाच कशा तीन प्रदक्षिणा घातल्या होत्या, त्याची कथा सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे करणनेही आपल्या आई-वडिलांना सेटवर तीन प्रदक्षिणा घालताना पाहून सारेच भावूक झाले होते. करणवीर म्हणाला, “तो खरोखरच एक छान भाग होता. कार्यक्रमातील सर्वच जुळ्या स्पर्धकांना आपापल्या आई-वडिलांची आठवण येत होती, त्यामुळे माझे आईवडील सेटवर येताच सर्वांच्या चेहर्यावर स्मितहास्य फुललं. त्यांना बघून सर्वच स्पर्धकांना आनंद झाला. हर्षा-वर्षा यांनी तर माझ्या आई-वडिलांना मिठीच मारली, कारण त्यांना त्यांच्या पालकांची खूप आठवण येत होती. माझ्या दृष्टीने माझे आई-वडील हेच माझं सर्वस्व असून त्यांच्याबद्दल माझी कृतज्ञता व्यक्त करण्याची यापेक्षा अधिक चांगली संधी मला मिळालीच नसती.बालगणेशाप्रमाणेच माझे माता-पिता हेच माझं सारं विश्व आहे. जी गोष्ट तुम्हाला सर्वाधिक प्रिय असते, तीच तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनते आणि तुमची सारी शक्ती त्यादिशेने वळविता… माझ्या आई-वडिलांना माझा अभिमान वाटावा, अशी माझी सुरुवातीपासून इच्छा होती. या भागाबद्दल जेव्हा मी त्यांना सांगितलं, तेव्हा माझ्या आईचं मन भरून आलं आणि तिच्या डोळ्य़ांतून अश्रू वाहू लागले होते. अशी संधी जीवनात क्वचितच मिळते.”‘इंडियाज बेस्ट जुडवा’ या कार्यक्रमाच्या आगामी भागांमध्ये या कार्यक्रमातील काही मनोरंजक, भावनीक प्रसंग रसिकांना पाहायला मिळतील.
तसेच या भागात ‘एक और एक ग्याराह’ या फेरीत उझ्मा-बुशरा यांच्याशी श्वेता-सविता स्पर्धा करतील. दोन जुळ्य़ा भावंडांना मिळालेल्या टास्कमध्ये कोण उत्तीर्ण होणार? हे पाहणेही रंजक असणार आहे.
तसेच या भागात ‘एक और एक ग्याराह’ या फेरीत उझ्मा-बुशरा यांच्याशी श्वेता-सविता स्पर्धा करतील. दोन जुळ्य़ा भावंडांना मिळालेल्या टास्कमध्ये कोण उत्तीर्ण होणार? हे पाहणेही रंजक असणार आहे.