तेजस्वी प्रकाश बनली सेलिब्रेटी मास्टरशेफची विजेती? व्हायरल होतोय फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 11:06 IST2025-02-21T11:04:58+5:302025-02-21T11:06:14+5:30
Tejasswi Prakash : टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग रिॲलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'(Celebrity Masterchef Show)मध्ये छोट्या पडद्यावरील अनेक बड्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. जे सध्या आपल्या चविष्ट खाद्यपदार्थाने परिक्षकांची मने जिंकत आहे.

तेजस्वी प्रकाश बनली सेलिब्रेटी मास्टरशेफची विजेती? व्हायरल होतोय फोटो
टीव्हीवरील लोकप्रिय कुकिंग रिॲलिटी शो 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'(Celebrity Masterchef Show)मध्ये छोट्या पडद्यावरील अनेक बड्या सेलिब्रिटींनी भाग घेतला आहे. जे सध्या आपल्या चविष्ट खाद्यपदार्थाने परिक्षकांची मने जिंकत आहे. दरम्यान, शोमध्ये सहभागी झालेली टीव्हीची सुंदर नागीण तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री शोच्या जजकडून विजेत्याची ट्रॉफी आणि चेक घेताना दिसत आहे. या फोटोने सोशल मीडिया युजर्सना आश्चर्यचकित केले आहे.
खरेतर तेजस्वीचा हा फोटो एका व्यक्तीने एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोत शेफ विकास खन्ना, शेफ रणवीर ब्रार आणि फराह खान हे तिन्ही परिक्षक शोच्या बक्षीस रकमेचा धनादेश अभिनेत्रीला देताना दिसत आहेत. चेकवर २५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम लिहिली आहे. फोटोमध्ये तेजस्वी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. परिक्षकांनी काळे कपडे घातले आहेत. फोटो शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले की, 'मी देखील तिच्या विजयाने आनंदी आहे, पण कृपया थांबा, धीर धरा..'
Although I would be happy if she wins but ruko zara, sabar karo 😭😂🤦🏻♀️#TejasswiPrakash#CelebrityMasterChefpic.twitter.com/gY2miVkqF8
— ♡ 🇵🇸 ♡ (@luvkapilsharma) February 18, 2025
युजर्सच्या प्रतिक्रिया
आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहून यूजर्सही चकित झाले आहेत. याशिवाय ते विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहे. एकाने लिहिले, 'सध्या शूटिंग सुरू आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'हे खरे आहे..' हा फोटो फोटोशॉपसारखा दिसतो, पण तो खरा आहे की खोटा हे शो संपल्यानंतरच कळेल.
शोमध्ये आहेत हे सेलिब्रिटी
'सेलिब्रिटी मास्टरशेफ' सुरू होऊन चार आठवडे झाले आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याचे काम दिले जाते. शोमध्ये तेजस्वी प्रकाश गौरव खन्ना, निक्की तांबोळी, अर्चना गौतम, आयेशा जुल्का, फैजू आणि उषा नाडकर्णी सारखे स्टार्स दिसत आहेत.