VIDEO : लयभारी! ऐश्वर्या रायच्या सुपरहिट गाण्यावर पल्लवी वैद्य अन् स्वाती देवलचा भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:21 IST2025-01-29T17:18:55+5:302025-01-29T17:21:05+5:30

सध्या कलाकार मंडळी हे आपल्या अभिनयासह सोशल मीडियावरील रिल्समुळे जास्त चर्चेत असतात.

television actress pallavi vaidya and swati deval dance on aishwarya rai superhit song video viral | VIDEO : लयभारी! ऐश्वर्या रायच्या सुपरहिट गाण्यावर पल्लवी वैद्य अन् स्वाती देवलचा भन्नाट डान्स

VIDEO : लयभारी! ऐश्वर्या रायच्या सुपरहिट गाण्यावर पल्लवी वैद्य अन् स्वाती देवलचा भन्नाट डान्स

Pallavi Vaidya And Swati Deval Video: सध्या कलाकार मंडळी हे आपल्या अभिनयासह सोशल मीडियावरील रिल्समुळे जास्त चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. असाच एक इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, नुकताच लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि स्वाती देवल यांनी ऐश्वर्या रायच्या 'अॅक्शन रिप्ले' या चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.


झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत सध्या जान्हवी आणि जयंत लग्नाची लगबग सुरु आहे. यानिमित्ताने मालिकेतील कलाकार सेटवरील मजामस्ती करतानाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहेत. अशातच पल्लवी वैद्यने शेअर केलेला हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या लक्ष वेधून घेत आहे. ऐश्वर्या रायच्या 'Chhan Ke Mohalla' या गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये दोन्ही अभिनेत्रींचा डान्स अनेकांना आवडला आहे. "Wedding fever... पुरानी chemistry है!" असं कॅप्शन पल्लवीने या व्हिडीओला दिलं आहे. पल्लवी- स्वाती यांचा हा डान्स व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर "लयभारी...", "जबरदस्त...", अशा कमेंट करत दोन्ही अभिनेत्रींचं कौतुक करत आहेत. 

दरम्यान, सध्या झी मराठीवरील 'पारु' आणि 'लक्ष्मी निवास' मालिकेचा हा महासंगम पाहायला मिळतोय. याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

Web Title: television actress pallavi vaidya and swati deval dance on aishwarya rai superhit song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.