बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:59 IST2025-02-23T10:59:05+5:302025-02-23T10:59:45+5:30
२३ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीचा अपघात झाल्याची बातमी समोर येतेय

बाईकच्या टायरमध्ये ड्रेस अडकला अन्...; २३ वर्षीय अभिनेत्रीचा भयानक अपघात, नेमकं काय घडलं?
'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' फेम अभिनेत्री रोशनी वालियाचा (roshni walia) अपघात झाला. बाइकने प्रवास करताना रोशनीचा ड्रेस गाडीच्या चाकात अडकला त्यामुळे हा अपघात घडला. रोशनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघाताचा हा भयानक अनुभव शेअर केलाय. रोशनी अवघ्या २३ वर्षांची आहे. तिने प्रवास करताना महिलांनी कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, याविषयी सूचना केल्या आहेत. काय घडलं नेमकं?
रोशनी वालियाचा अपघात
रोशनीने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने अपघात कसा झाला हे सांगितलंच शिवाय जखमेचा घाव सर्वांना दाखवला. रोशनी म्हणाली, "सध्य मी खूप वेदना सहन करत आहे. माझा अपघात कसा झाला हे अनेकांना जाणून घ्यायचं असेल तर मी सांगू इच्छिते की, माझा ड्रेस टायरच्या चाकात अडकला. हा खूप भयानक अनुभव होता. कृपया बाइकवरुन प्रवास करताना लूझ कपडे परिधान करु नका. मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. माझ्या तब्येतीची चौकशी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद."
सध्या रोशनी या अपघातामधून सावरत आहे आणि आराम करतेय. रोशनीने 'मैं लक्ष्मी तेरे अंगने की', 'देवों के देव महादेव', 'भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप', 'ये वादा रहा' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय अनेक वेब शो आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये रोशनीने अभिनय केलाय. रोशनीने या अपघातातून पुन्हा अभिनय क्षेत्रात लवकरात लवकर सक्रीय व्हावी अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे.