देवोलिना भट्टाचार्जीने दीड महिन्यांनी जाहीर केलं मुलाचं नाव; अर्थ आहे फारच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:50 IST2025-01-28T09:46:06+5:302025-01-28T09:50:26+5:30
'गोपी बहू'ने दीड महिन्यांनी जाहीर केलं मुलाचं नाव; जाणून घ्या नावाचा अर्थ.

देवोलिना भट्टाचार्जीने दीड महिन्यांनी जाहीर केलं मुलाचं नाव; अर्थ आहे फारच खास
Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय असं नाव आहे. साथ निभाना साथियां या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. अलिकडे देवोलिनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्रीने १८ डिसेंबर २०२४ रोजी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती. दरम्यान, आता आपल्या मुलांच्या जन्मानंतर देवोलिना भट्टाचार्जीने त्याचं नामकरण केलं आहे.
सोशल मीडियावर देवोलिनाने लाडक्या लेकासोबतचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा पती शानवाज शेख देखील दिसतो आहे. दरम्यान अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने म्हटलंय, आहेत. आमच्या कुटुंबामध्ये नवीन सदस्याचं स्वागत करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. आमचा जॉय, बंडल ऑफ हॅप्पीनेस! असं कॅप्शन देवोलीनाने दिलं आहे.या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. देवोलिना आणि शहनवाजने त्यांच्या मुलाचं नाव 'जॉय' ठेवलं आहे. 'जॉय' या नावाचा अर्थ आनंद किंवा खुशी असा होतो.
देवोलिनाने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली होती. आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर आता दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आईबाबा होणार आहे. नव्या पाहुण्याची चाहुल लागल्याने त्यांचे कुटुंबीयही आनंदी आहेत.