माझी तुझी रेशीमगाठ: नेहासमोर यश व्यक्त करणार भावना; काय असेल नेहाचं उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:30 IST2021-10-22T15:30:00+5:302021-10-22T15:30:00+5:30
Mazhi tuzhi reshimgaath: सध्या ही मालिका रंजक वळणार आली असून यशच्या मनात नेहाविषयी प्रेम जागृत व्हायला सुरुवात झाली आहे.

माझी तुझी रेशीमगाठ: नेहासमोर यश व्यक्त करणार भावना; काय असेल नेहाचं उत्तर?
छोट्या पडद्यावर सध्या अनेक नवनवीन मालिकांची रेलचेल सुरु आहे. मात्र, या मालिकांच्या गर्दीत अशा मोजक्याच मालिका असतात ज्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi tuzhi reshimgaath). अभिनेता श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहरे (prarthana behare) यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होतांना दिसत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणार आली असून यशच्या मनात नेहाविषयी प्रेम जागृत व्हायला सुरुवात झाली आहे.
यश आणि नेहा यांच्यातील मैत्री हळूहळू फुलू लागली आहे. दोघंही एकमेकांचे बेस्ट फ्रेंड झाले असून नेहा यशला तिच्या जीवनातील अनेक लहान-मोठ्या गोष्टी शेअर करत आहे. विशेष म्हणजे यश आता नेहाच्या प्रेमात पडू लागल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर कंपनीला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑफिसमध्ये पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पूजेच्यावेळी नेहा अत्यंत सुंदर दिसत असून यश त्याच्या मनातील गोष्ट तिला सांगणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेचं चित्रीकरण कुठे सुरू आहे माहितीये का?
दरम्यान, कंपनीला ५० वर्ष झाल्यामुळे ऑफिसमध्ये पूजा करण्यात येते. यावेळी नेहा साडी नेसून येतं. या साडीमध्ये नेहा सुंदर दिसत असल्यामुळे ऑफिसमधील प्रत्येक जण तिचं कौतुक करतो. विशेष म्हणजे यश सुद्धा नेहाला त्याच्या मनातील गोष्ट म्हणजेच ती छान दिसते हे सांगायचा प्रयत्न करतो. मात्र, हे सांगत असताना त्याला प्रचंड अवघडायला होतं. त्यामुळे यश नेहाला तिच्या मनातील गोष्ट कधी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.