"तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे...", अश्विनी महांगडेची रक्षाबंधनादिनानिमित्त खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 12:25 PM2024-08-19T12:25:54+5:302024-08-19T12:28:02+5:30

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रक्षाबंधनानिमित्त इंस्टाग्रामवर भावासोबत व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

"Tere Sare Dukh Mere, Mere Sare Sukh Tere...", special post by Ashwini Mahangde on the occasion of Raksha Bandhan. | "तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे...", अश्विनी महांगडेची रक्षाबंधनादिनानिमित्त खास पोस्ट

"तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे...", अश्विनी महांगडेची रक्षाबंधनादिनानिमित्त खास पोस्ट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मध्ये अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) ला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिला या भूमिकेतून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अश्विनीचा सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. दरम्यान आता तिने रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने रक्षाबंधनानिमित्त इंस्टाग्रामवर भावासोबत व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिली आहे की, बद्री......तुझ्याकडे बघून मला काय असं वाटतं की माझ्याजवळ बेस्ट भाऊ आहे... आपण काही दुःखाचे क्षण आणि असे खूप खूप आनंदाचे क्षण जगलो आणि अजूनही जगत आहोत. मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. मी कायम सोबत असेन. माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. 


तिने पुढे लिहिले की, तेरे सारे दुख मेरे, मेरे सारे सुख तेरे... रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा त्या सगळ्यांना जे आजही #स्वराज्यरक्षक_ संभाजी ही मालिका संपूनही राणूआक्कासाहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नात्याचा आदर करत मला मनापासून शुभेच्छा देतात. ज्या भावाला बहीण नाही अशी अनेक मुलं मला मेसेज करतात त्या सगळ्यासाठी खूप खूप आभार... आजच्या दिवसासाठी हा बेस्ट व्हिडिओ.. बद्रिनाथ महांगडे.

वर्कफ्रंट...
अश्विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपली छाप उमटविली आहे. तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’ या नाटकात काम केले आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत मनालीची भूमिका तिने केली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय तिने बॉईज, टपाल, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: "Tere Sare Dukh Mere, Mere Sare Sukh Tere...", special post by Ashwini Mahangde on the occasion of Raksha Bandhan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.