'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 11:57 IST2024-11-07T11:57:18+5:302024-11-07T11:57:44+5:30
'ठरलं तर मग' मालिकेतील एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावरून अभिनेत्रीने आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लवकरच होणार आई
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधतीच चाहत्यांची मनं जिंकली. या मालिकेतील अर्जुन-सायलीच्या जोडीबरोबरच इतर पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेतील एका अभिनेत्रीने गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावरून अभिनेत्रीने आई होणार असल्याचं सांगितलं आहे.
मालिकेत अर्जुनच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री मोनिका दबडे साकारत आहे. मोनिका लवकरच आई होणार आहे. इन्स्टाग्रामवर तिने पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना सांगितली आहे. मोनिका गरोदर असून लग्नानंतर तिच्या पहिल्या बाळाला ती जन्म देणार आहे. येणारं नववर्ष मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांसाठी खास असणार आहे. या २०२५ वर्षातील एप्रिल महिन्यात मोनिका बाळाला जन्म देणार असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.
मोनिकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन पतीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात चिमुकले बूट दिसत आहे. मोनिकाला नव्या पाहुण्याची चाहुल लागली आहे. आई होणार असल्याने मोनिका आणि तिचे कुटुंबीयही आनंदी आहेत. चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.