'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:37 PM2024-06-23T13:37:33+5:302024-06-23T13:38:02+5:30

'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील २४ वर्षीय गौरव काशिदे यांचं अपघाती निधन झालं आहे. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

tharal tar mag team member gaurav kashide died in accident jui gadkari shared emotional post | 'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट

'ठरलं तर मग'च्या टीममधील कलाकाराचं निधन; जुई गडकरीची भावुक पोस्ट

मनोरंजनविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील कलाकाराचं निधन झालं आहे. २४ वर्षीय गौरव काशिदे यांचं अपघाती निधन झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्या निधनाने ठरलं तर मग मालिकेच्या कलाकारांना धक्का बसला आहे. ९ जूनला रात्री कामावरुन घरी परतत असताना गौरवचा मुंबईतील वांद्रे येथे अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. गेले काही दिवस तो कोमात होता. अखेर शनिवारी(२२ जून) त्याची मृत्यूशी झुंज संपली. त्याच्या निधनानंतर अभिनेत्री जुई गडकरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

जुई गडकरीची भावुक पोस्ट

“ताई मला कोणी उठवलंच नाही, म्हणून लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळूहळू...

सिनचे que देताना जर ते character पळत आलेले असेल तर तो पळून पण दाखवायचा. हुषार होता...मला रोजचे सिन explain करायचा. हसतमुख होता,मेहनती होता...त्या वयात मुलं असतात तसा अल्लड पण होता. मला थोडा घाबरायचा म्हणून “ताईसमोर स्मोक करुन गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते...त्यापेक्षा नाही करत स्मोक” असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा...गुणी मुलगा होता...

रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका female AD ला आणि hair dresser ला घरी सोडून जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला. त्या दिवशी नेमकी आमची hairdresser चारकोपलाच उतरली. नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा...

त्याचा २४ वा वाढदिवस होता १०जूनला...९तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रेमध्ये भीषण अपघात झाला. त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता. पण सगळ्यांशी त्याने छान नातं जोडलं होतं. गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल...

गौरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे...तू लेट आला असतास,पण आला तरी असतास...तुझ्या आत्म्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं? त्या आईबाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करू शकत नाही...देव त्यांना बळ देवो...गौरव काशिदे  u will be missed 🙏

जुई गडकरीची ही पोस्ट भावुक करणारी आहे. गौरवने सोनी मराठीवरील 'गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. त्याच्या निधनाने कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Web Title: tharal tar mag team member gaurav kashide died in accident jui gadkari shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.