'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची झलक, म्हणाली - "एक चेहरा आपल्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:47 IST2025-04-15T13:47:35+5:302025-04-15T13:47:56+5:30

Monika Dabade : 'ठरलं तर मग' मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झाली आहे.

'Tharala Tar Mag' fame actress Monika Dabade showed a glimpse of the baby, said - ''A face for us...'' | 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची झलक, म्हणाली - "एक चेहरा आपल्याला..."

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची झलक, म्हणाली - "एक चेहरा आपल्याला..."

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ठरलं तर मग (Tharala Tar Mag). या मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. या मालिकेत अस्मिताच्या भूमिकेतून अभिनेत्री मोनिका दबडे (Monika Dabade) घराघरात पोहचली. नुकतीच ती आई झाल्यामुळे सध्या ती मालिकेत काम करताना दिसत नाही. मोनिका सध्या मॅटर्निटी लिव्हवर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देताना दिसते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर बाळासोबतचा फोटो शेअर करत तिचा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री मोनिका दबडे हिने बाळासोबत फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, आमचा १ महिना ... बाळाला आणि मला आई होऊन तब्बल 1 महिना झाला पण ... सी-सेक्शनमुळे पोटात आणि पाठीत होत असलेल्या वेदना... अपुरी झोप.. कोणाचीही मदत न घेता स्वतः सगळं करण्याचा माझा अट्टाहास ... आवडतं काम करता न येण्यामुळे होणारी रडरड.. हवं ते न खाता येण्यामुळे जेवणाची इच्छा जाणे ... आणि बरंच काही होत असताना.. फक्त एक चेहरा आपल्याला हे सगळं विसरण्याची भुरळ घालू शकतो.. ह्यावर कधीही विश्वास नसलेली मी.. आणि माझी गोंडुबाई ... मोनिकाच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.


सोशल मीडियावर दिली अभिनेत्रीने खुशखबर
मोनिका दबडे आणि चिन्मय कुलकर्णी यांना कन्यारत्न प्राप्त झाले. होळीच्या दुसऱ्या दिवशी १५ मार्च रोजी मोनिकाने गोंडस लेकीला जन्म दिला. लेकीबरोबरचा पहिला फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही गोड बातमी दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की,दाहीदिशांतून कशी नांदी झाली हो...गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो...आणि नवे पर्व सुरु ...१५.०३.२०२५. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.

प्रेग्नेंसीतही मोनिका करत होती मालिकेत काम
प्रेग्नेंसीतही मोनिका ठरलं तर मग मालिकेत काम करत होती. मालिकेच्या सेटवर तिचे बेबी शॉवरही करण्यात आले होते. त्यानंतर तिने मालिकेतून ब्रेक घेतला. सध्या ती मदरहूड एन्जॉय करत आहे. 
 

Web Title: 'Tharala Tar Mag' fame actress Monika Dabade showed a glimpse of the baby, said - ''A face for us...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.