TV च्या लाडक्या सूनेला ओळखलं का? जुना फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 15:52 IST2025-03-30T15:50:30+5:302025-03-30T15:52:12+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहून अनेकांनी अभिनेत्रीला बरोबर ओळखलं आहे.

TV च्या लाडक्या सूनेला ओळखलं का? जुना फोटो होतोय व्हायरल
सोशल मीडियाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोशल मीडियावर सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकरांचे जुने फोटो व्हारल होत असतात. काही वेळा तर असे फोटो असतात, ज्यामध्ये त्या कलाकाराला ओळखणंही कठीण होतं. सध्या असाच एक फोटो चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोतील अभिनेत्रीला ओळखणं अवघड आहे. फोटोतील अभिनेत्री आज TV ची लाडकी सून आहे. तिची मालिका टीआरपीमध्ये कायम अव्वल असते.
सोशल मीडियावर व्हायर झालेला हा फोटो पाहून अनेकांनी अभिनेत्रीला बरोबर ओळखलं आहे. तर काही जणांना तर ती ओळखूही आली नाहीये. तर ती अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari). हा तिचा जुना फोटो 'पुढचं पाऊल' मालिकेतील आहे. 'ठरलं तर मग'च्या आधी जुईने स्टार प्रवाहवर 'पुढचं पाऊल' ही मालिका केली होती. या मालिकेला आता बरीच वर्ष झाली आहेत. तिचा मेकअप आणि अवतार पाहून कोणी म्हणणारच नाही की ही जुई आहे म्हणून.
सध्या जुई ही 'ठरलं तर मग' मालिकेत सायली सुभेदार ही भूमिका साकारते आहे. या मालिकेत सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. अलीकडेच पार पडलेल्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ या सोहळ्यात 'ठरलं तर मग' या मालिकेने 'महाराष्ट्राची महामालिका प्रेक्षक पसंती' हा पुरस्कार पटकावला आहे. टीआरपी यादीमध्ये ही मालिका अव्वल स्थानी आहे.