'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीने ६८व्या वर्षी खरेदी केली कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:57 AM2024-10-04T11:57:10+5:302024-10-04T11:58:02+5:30

'ठरलं तर मग' मालिकेतील सर्वांची लाडकी 'पूर्णा आजी' म्हणजेच ज्योती चांदेकर यांनी नुकतंच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. 

Tharala Tar Mag Fame Purna Aaji Aka Jyoti Chandekar Bought Car At The Age Of 68 Tejaswini Pandit Shares Post To Support Mother | 'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीने ६८व्या वर्षी खरेदी केली कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी पोस्ट

'ठरलं तर मग' फेम पूर्णा आजीने ६८व्या वर्षी खरेदी केली कार, तेजस्विनी पंडितची आईसाठी पोस्ट

सध्या छोट्या पडद्यावर 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका चांगलीच गाजत आहे. टीआरपीतही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. हटके स्टोरीमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री तर विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील 'पूर्णा आजी'ची अर्थात अन्नपूर्णा सुभेदार या पात्राला चाहते भरभरुन प्रेम देत आहेत. मालिकेतील सर्वांची लाडकी 'पूर्णा आजी' म्हणजेच ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांनी नुकतंच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. 

ज्योती चांदेकर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी स्वतःच्या कमाईने ही गाडी खरेदी केली आहे. ज्योती चांदेकर यांची लेक अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित हिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. तिने आईबरोबरचे नव्या गाडीबरोबरचा फोटो शेअर केले आहेत. आपल्या आईचं खास कौतुक करत तेजस्विनीने लिहलं, "ज्योती चांदेकर... ५२ वर्षाची कारकीर्द... आजतागायत २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर असणारी मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आणि मग माझी आई. आई यासाठी नंतर कारण काही व्यक्तिमत्त्व ही कामासाठी आधी आणि घरच्यांसाठी नंतर बनलेली असतात".

 तेजस्विनीने पुढे लिहलं, "आईने काम सुरु केलं, तेव्हा ती १२ वर्षांची होती. मग तिचं लग्न झालं. तरी तिने काम करणं सोडलं नाही. मग दोन मुली झाल्या. आम्हाला बरोबर घेऊन पण ती काम करतच होती आणि मग मुली कमवायला लागल्या. तरीही ती काम करतच होती आणि अजूनही ती काम करतेच आहे. थोडक्यात सांगायचं तर या सगळ्या प्रवासात तिची एक तक्रार होती. बसने, ट्रेनने, लोकल गाड्यांनी, आधी बाबाने घेतलेल्या गाडीने आणि मग लेकीने घेऊन दिलेल्या गाडीने खूप फिरले. मग काही काळ धैर्यच्या गाडीने प्रवास केला, आता मला माझी गाडी हवी आहे".

"शेवटी या हट्टी बाईने, माझ्या आईने वय वर्ष ६८ व्या वर्षी तिच्या कमाईची, स्वकष्टाची, स्वतःची गाडी घेतलीच. माझ्या आईची तिच्या कामाप्रती असलेली श्रद्धा व जिद्दीला सलाम. माझ्यासाठी तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून नकळत ही ठरली आमच्यासाठी 'येक नंबर मोमेंट'. आई तुला खूप प्रेम", या शब्दात तेजस्विनीने आपला आनंद व्यक्त केला.  अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

Web Title: Tharala Tar Mag Fame Purna Aaji Aka Jyoti Chandekar Bought Car At The Age Of 68 Tejaswini Pandit Shares Post To Support Mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.