Jui Gadkari : कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा ‘तो’ सुद्धा तिथेच लपलेला असतो..., जुईने शेअर केला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 04:28 PM2022-12-29T16:28:56+5:302022-12-29T16:38:43+5:30
Jui Gadkari : गाडीतले सीन्स शूट करताना नेहमीच गाडीत तिसरी व्यक्ती हजर असते. अर्थात ती लपलेली असते. विश्वास बसत नसेल तर अभिनेत्री जुई गडकरी हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा....
चित्रपट असो की मालिका... ते बनवण्यामागं अनेकांचे कष्ट असतात. पडद्यामागं वेगवेगळे खटाटोप करून सीन्स शूट केले जातात. आता हेच बघा, गाडीतले सीन्स शूट करताना नेहमीच गाडीत तिसरी व्यक्ती हजर असते. अर्थात ती लपलेली असते. विश्वास बसत नसेल तर अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने शेअर केलेला हा सेटवरचा व्हिडीओ तुम्ही बघायलाच हवा.
जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करतेय. स्टार प्रवाहवरच्या या मालिकेचं शूट सुरू असतानाचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. मालिकेत म्हणा, चित्रपटात म्हणा सर्रास गाडीतले सीन दाखवण्यात येतात. गाडीत हिरो-हिरोईन पुढच्या सीटवर बसलेले दिसतात. पण त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती त्यांच्यासोबत हजर असते. जुईने व्हिडिओ शेअर करत ती व्यक्ती नेमका कुठे लपलेली असते आणि काय करत करते हे दाखवलं आहे.
जुईने पोस्ट केलेल्या व्हिडिओत ती आणि मालिकेचा मुख्य अभिनेता गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. तर मालिकेचा सहाय्यक दिग्दर्शक पाठीमागच्या सीटच्या इथे पाय ठेवायला असलेल्या जागेत लपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत तिने लिहिलं, ‘जेव्हा कारमधले सीन्स शूट होतात, तेव्हा आम्ही दोघांशिवाय आणखी एक तिसरी व्यक्ती गाडीत लपलेली असते. अतिशय अवघड जागेत स्वत:ला लपवून ती व्यक्ती एकाचवेळी अनेक गोष्टी करत असते. स्क्रिप्ट फॉलो करणं, साऊंड रोल करणं, टेक करणं, टेक्निकल गोष्टी सांभाळणं. प्रत्येक दृश्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते...’जुईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्टार प्रवाहावरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर ती आता ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतेय.