तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना! ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत जुई गडकरीची धमाल, पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:03 IST2025-04-17T15:58:46+5:302025-04-17T16:03:57+5:30

ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत जुई गडकरीची धमाल, पाहा व्हिडीओ 

tharla tar mag fame actress jui gadkari fun with her onscreen mother in law video viral on social media | तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना! ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत जुई गडकरीची धमाल, पाहा व्हिडीओ 

तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना! ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत जुई गडकरीची धमाल, पाहा व्हिडीओ 

Jui Gadkari: सासू-सूनेचे नाते हे जगावेगळे असते. प्रत्यक्षात सासू ही सूनेची जवळची मैत्रीणच असते, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याचं नातं हे प्रेमळ आणि घट्ट असतं. सध्या सोशल मीडियावर टीव्ही मालिकेतील अशाच ऑनस्क्रीन सासू-सूनेच्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेतील सायली आणि कल्पनाच्या या व्हिडीओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मालिकेत सायलीच्या  विरोधात उभ्या राहणाऱ्या कल्पनाचा सूनेसोबत बॉण्ड या व्हायरल व्हिडीओमधून पाहायला मिळतोय. 


नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मालिकेती तिच्या ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजेच कल्पनासोबत धमाल करताना दिसते आहे. ट्रेंडिंग गाण्यावर जुईने अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णींसोबत छान अशी रिल तयारी केली आहे. त्यामध्ये या दोघींना पाहून नेटकरी सुद्धा प्रचंड खूश झाले आहेत. 

सायली-कल्पनाचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून एका चाहतीने कमेंट करत म्हटलंय की, हाच बाँड आह्मी खूप मिस करतोय!! तर आणखी एका यूजरने लिहिलंय खूप क्यूट... अशा म्हणत चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Web Title: tharla tar mag fame actress jui gadkari fun with her onscreen mother in law video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.