स्वप्नपूर्ती! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं खरेदी केली नवी गाडी; शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 18:05 IST2024-12-11T18:03:51+5:302024-12-11T18:05:36+5:30
'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेनं खरेदी केली नवी गाडी,पाहा फोटो.

स्वप्नपूर्ती! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं खरेदी केली नवी गाडी; शेअर केले खास फोटो
Monika Dabade: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (tharla tar mag) ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केली. शिवाय टीआरपीच्या यादीत सुद्धा ही मालिका अव्वल स्थानावर असते. दरम्यान, या मालिकेमध्ये अभिनेत्री मोनिका दबडे(Monika Dabade) अर्जुनच्या बहिणीचं म्हणजेच अस्मिता नावाचं पात्र साकारत आहे. मालिकेत तिची ही भूमिका नकारात्मक असल्याची पाहायला मिळतेय. अलिकडेच मोनिकाने ती आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना सांगितली होती. त्यामुळे मालिकाविश्वात तिच्याविषयी चर्चा होऊ लागली. अशातच नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
मोनिकाने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करच चाहत्यांसोबत एक गुडन्यूज शेअर केली आहे. २०२४ च्या वर्षाखेरीस तिने नवी गाडी खरेदी केली आहे. "स्वप्नपूर्ती आणि तयारी..." असं कॅप्शन तिने या पोस्टला दिल्याचं पाहायला मिळतंय. अभिनेत्री मोनिका दबडेने टाटा नेक्सॉन ही गाडी विकत घेतली आहे. #Tata #Nexon #Picoftheday असे हॅशटॅग तिने या फोटोंना दिले आहेत. मोनिकाने शेअर केलेल्या या पोस्टवर अभिनेत्री गिरिजा प्रभू, जुई गडकरी आणि शर्वरी जोग या कलाकारांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, 'ठरलं तर मग मालिकेमुळे मोनिका घराघरात पोहोचली आहे. तिच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली आहे. आता येणारं नववर्ष मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांसाठी खास असणार आहे. या २०२५ वर्षातील एप्रिल महिन्यात मोनिका बाळाला जन्म देणार असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.