"कौतुकाची थाप आपल्या माणसांकडून असेल तर...", 'ठरलं तर मग' मधील सायलीच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:04 IST2025-03-25T16:02:21+5:302025-03-25T16:04:47+5:30

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

tharla tar mag fame actress prajakta kulkarni shared special post on social media netizens react  | "कौतुकाची थाप आपल्या माणसांकडून असेल तर...", 'ठरलं तर मग' मधील सायलीच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची खास पोस्ट

"कौतुकाची थाप आपल्या माणसांकडून असेल तर...", 'ठरलं तर मग' मधील सायलीच्या ऑनस्क्रीन सासूबाईंची खास पोस्ट

Prajakta Kulkarni : स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (tharla Tar Mag) ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. अभिनेत्री जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अव्वल स्थावर असते. मालिकेतील सायली-अर्जूनसह पूर्णा आजी, प्रतिमा आत्या तसेच कल्पना, प्रताप, अश्विन या पात्रांनी प्रेक्षकांना आपलसं केलं आहे. दरम्यान, मालिकेत सायलीच्या सासूची म्हणजेच कल्पनाची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी (Prajakta Kulkarni) यांनी साकारली आहे. सध्या प्राजक्ता कुलकर्णी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. 


नुकतीच सोशल मीडियावर प्राजक्ता कुलकर्णी यांनी खास पोस्ट शेअर केलाी आहे. या पोस्टद्वारे आपल्या मनातील भावना व्यक्त करत त्यांनी लिहिलंय की, "प्रत्येक ट्रॅाफी काम करण्याची नवीन ऊर्जा देते! पण जर ती कौतुकाची थाप आपल्या माणसांकडून असेल तर आनंदही दुप्पट असतो!! “कल्पना” या पात्रासाठी मिळालेली ही पहिली ट्रॅाफी! आपण सगळेच आपापल्यापरीने मनापासून काम करतच असतात! पण प्रेक्षक जेव्हा “फॅनपेज” सुरु करतात आणि फॅनपेज फक्त फॅनपेज न राहता “हितचिंतक” बनतं तेव्हा असे गोड प्रसंग वारंवार घडतात! "

यापुढे अभिनेत्रीने लिहिलंय, "तुमचं प्रेमच रोज उत्तम काम करण्याची ऊर्जा देतं! हे प्रेम असंच राहुद्या! तुम्ही घेतलेल्या मेहनतीला... तुमची, कल्पना!"

वर्कफ्रंट

दरम्यान, धडाकेबाज या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका होत प्राजक्ता कुलकर्णी यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यांनी साकारलेल्या गावरान ठसकेबाज गंगूची भूमिका विशेष गाजली. या चित्रपटानंतर त्या  'आग', 'शोध', 'ऋणानुबंध','छत्रीवाली', 'पोरबाजार', 'का रे दुरावा', 'दुर्गेश नंदिनी', 'धांगड धिंगा'. 'ऑल द बेस्ट', 'दामिनी', 'आपली माणसं', 'चार दिवस सासूचे अशा चित्रपट, मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.

Web Title: tharla tar mag fame actress prajakta kulkarni shared special post on social media netizens react 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.