खऱ्या आयुष्यात चाहतीच्याच प्रेमात पडला अर्जुन, डोंबिवली स्टेशनवर अशी सुरु झाली 'लव्हस्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:20 IST2024-03-18T15:18:15+5:302024-03-18T15:20:26+5:30
अमित भानुशाली सध्या 'ठरलं तर मग' मालिकेमुळे प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला आहे.

खऱ्या आयुष्यात चाहतीच्याच प्रेमात पडला अर्जुन, डोंबिवली स्टेशनवर अशी सुरु झाली 'लव्हस्टोरी'
मराठीतील सध्याची गाजत असलेली मालिका 'ठरलं तर मग' मधून लोकप्रिय झालेला अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली (Amit Bhanushali) सर्वांचा लाडका आहे. त्याचा कधी विनोदी कधी रोमँटिक असा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडतो. अर्जुन आणि सायली या जोडीचे मराठी प्रेक्षक चाहतेच आहेत. पण अमितच्या खऱ्या आयुष्यातली सायली कोण आणि त्यांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली माहितीये का?
अमित भानुशाली ९ वर्षांपूर्वीच श्रद्धासोबत लग्नबंधनात अडकला. त्यांचं लव्हमॅरेजच झालं. विशेष म्हणजे श्रद्धा अमितची चाहती होती. डोंबिवली स्टेशनवर गुजराती मुलगा आणि मराठी मुलीच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दोघांनी आपली लव्हस्टोरी कशी सुरु झाली ते सांगितलं. दोघांची पहिली भेट डोंबिवली स्टेशनवर झाली. दोघंही ट्रेनमध्ये चढले. श्रद्धा लेडीज कंपार्टमेंटमध्ये चढली. तर अमित बाजूच्या जनरल कंपार्टमेंटमध्ये चढला. दोघांनी मधल्या जाळीतून एकमेकांना नोटीस केलं. तेव्हा अमित 'मन उधाण वाऱ्याचे'मध्ये होता. श्रद्धाने त्याला ओळखलं होतं. तिने घरी गेल्यावर त्याला सोशल मीडियावर शोधलं पण तिला त्याचं खरं नावच मिळेना.
ती पुढे म्हणाली,"शेवटी घरी सगळं जेवण वगरे आवरुन झाल्यावर रात्री १ वाजता तिला त्याचं खरं नाव दिसलं. तिने फेसबुकवर त्याला मेसेजही केला की तिला त्याचं काम आवडतं. ऑल दी बेस्ट. नंतर ती झोपली. सकाळी ४ वाजता अमितने तिला रिप्लाय दिला होता. यानंतर दोघांनी गप्पा मारत मारत एकमेकांचे नंबर घेतले. काही दिवसांनी बोलता बोलता त्यांना कळलं की दोघंही बाजूबाजूच्याच सोसायटीत राहतात. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि अमितने श्रद्धाला थेट लग्नासाठीच प्रपोज केलं. केवळ १५ दिवसांच्या रिलेशनशिपनंतर ते थेट लग्नबंधनातच अडकले."