महिपतला समोर पाहून प्रतिमाला आठवणार का तिचा भूतकाळ? 'ठरलं तर मग' मालिका उत्कंठावर्धक वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 11:22 IST2024-11-30T11:19:17+5:302024-11-30T11:22:57+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tarla Tar Mag) मालिका सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

महिपतला समोर पाहून प्रतिमाला आठवणार का तिचा भूतकाळ? 'ठरलं तर मग' मालिका उत्कंठावर्धक वळणावर
Tarla Tar Mag: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tarla Tar Mag) मालिका सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. सध्या मालिकेचं कथानक सायली-अर्जुनच्या भोवती फिरताना दिसत आहे. अलिकडेच या मालिकेचा एका प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये प्रतिमाच्या समोर महिपत येतो आणि तिला भूतकाळातील घटना अंधुक आठवायला लागतात, असं दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, मालिकेत किल्लेदार कुटुंबीयांचा अपघात झाल्यापासून प्रतिमा या सगळ्यांपासून दुरावलेली असते. ती ओळख बदलून दुसरीकडे राहत असते. परंतु, सायलीला प्रतिमा जिवंत असल्याची खात्री पटते आणि ती शोधाशोध करण्यास सुरुवात करते. अखेर सायलीच्या प्रयत्नांना यश येतं तिला प्रतिमा आत्या अलिबागमध्ये सापडते. त्यानंतर सायली सुभेदारांच्या लेकीला घरी परत घेऊन येते. सुभेदारांची लेक प्रतिमा घरी परत आल्याने नागराज आणि महिपतच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्रतिमाला पुन्हा सगळं काही आठवलं तर आपली खैर नाही याची भीती त्यांना सतावते आहे. परंतु स्टार प्रवाहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये प्रतिमा आत्याला महिपतला समोर पाहताच घटना पुसटशी आठवते आहे, असं दाखवण्यात आलंय. त्यामुळे या मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या प्रोमोमध्ये दिसतंय की, रात्रीच्या वेळेस रविराज किल्लेदार आणि प्रतिमा दोघे घरी परत जात आहेत. या वेळी रविराज त्याच्या एका विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी जातो. परंतु प्रतिमा पाय मोकळे करत म्हणत गाडीतून बाहेर येते आणि रस्त्यावर फेरफटका मारत असते. त्यावेळी तिला समोर महिपत शिखरे दिसतो. महिपतला समोर पाहून प्रतिमाला अपघाताच्या वेळी घडलेली घटना आठवू लागते. त्यामुळे ती प्रचंड घाबरते. परंतु तिथे असलेल्या तरुणांचं लक्ष तिच्याकडे जात आणि ते प्रतिमाकडे धाव घेतात. त्यानंतर रविराज येतो आणि इथेच प्रोमो संपवण्यात आला आहे.