'अलीबाबा 2’ मध्ये या अभिनेत्याची झाली एंट्री, दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 05:31 PM2023-04-04T17:31:29+5:302023-04-04T17:32:17+5:30

Alibaba 2 : 'अलीबाबा – एक अंदाज अनदेखा : चॅप्टर 2’ या लोकप्रिय कौटुंबिक मनोरंजनपर मालिकेत अली - द रखवाला आपल्या देशाला वाचवण्यासाठी दुष्ट शक्तींविरुद्ध कसा लढतो, याची चित्तथरारक कहाणी सांगण्यात आली आहे.

The actor made his entry in 'Alibaba 2' and will be seen in a negative role | 'अलीबाबा 2’ मध्ये या अभिनेत्याची झाली एंट्री, दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

'अलीबाबा 2’ मध्ये या अभिनेत्याची झाली एंट्री, दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

googlenewsNext

सोनी सबवरील 'अलीबाबा – एक अंदाज अनदेखा : चॅप्टर 2’ (Alibaba Ek Andaj Undekha : Chapter 2) या लोकप्रिय कौटुंबिक मनोरंजनपर मालिकेत अली - द रखवाला (अभिषेक निगम) हा आपल्या देशाला वाचवण्यासाठी दुष्ट शक्तींविरुद्ध कसा लढतो, याची चित्तथरारक कहाणी सांगण्यात आली आहे. मनाचा ठाव घेणारी पात्रे आणि गोळीबंद कथानकामुळे ही मालिका चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. गेल्या काही भागांत सिमसिमची (सायंतनी घोष) पिरॅमिडमधून सुटकेनंतर मालिकेच्या आवडत्या खलनायकाची पुन्हा एंट्री झाली आहे. तथापि, मालिकेच्या निर्मात्यांनी एक एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. सिमसिमचा दुष्ट साथीदार इब्लिस याचे मालिकेत पहिल्यांदा दर्शन घडले आहे. 

कलाकारांच्या या तुकडीत आता प्रतिभावंत अभिनेता आरव चौधरी याचाही प्रवेश झाला आहे. तो या मालिकेत इब्लिस या खलनायकाची भूमिका साकारत आहे. इब्लिस ही एक जुलमी व्यक्ती असून त्याला अवघ्या पृथ्वीवर दुष्ट शक्ती पसरवायची आहे. त्यासाठी निरापध्यांचा जीव घेण्यासह प्रचंड विध्वंस घडवण्यासही तो मागेपुढे पाहत नाही. तो निर्दयी, धाडसी आणि तितकाच धूर्तही आहे. त्याची भक्त आणि प्रेयसी सिमसिम हीदेखील त्याच्यासोबत मिळालेली आहे. आपण एक राक्षस असल्यामुळे आपल्याला ठार मारले जाऊ शकत नाही, याची त्याला माहिती आहे. यामुळे तो अधिकच शक्तिशाली आणि क्रूर बनला आहे. मुस्तफा आणि त्याचा मुलगा अलीबाबा हे इब्लिसचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुष्ट शक्तींना पसरवण्यापासून रोखण्याची जादुई शक्ती अलीबाबाकडे आहे. इब्लिसला ही जादू आणि ती ज्याच्या कुणाच्या हातात आहे, त्याला नष्ट करण्याची इच्छा आहे. कारण त्याचा दुष्ट आत्मा त्याच्या ताईतमध्ये बंदिस्त आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विलग होणे त्याला परवडणारे नाही. मालिकेतील त्याच्या प्रवेशामुळे प्रेक्षकांना चित्तथरारक प्रसंग पाहण्याची पर्वणी मिळणार आहे, हे नक्की.


इब्लिसची भूमिका मिळवण्याबाबत आरव चौधरी म्हणाला की, “एक दुष्ट व्यक्तिरेखा साकारणे हे खचितच आव्हानात्मक आहे. प्रेक्षकांना माझे काम आवडेल, याची मला पूर्णपणे खात्री आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपैकी इब्लिसचे पात्र खूप वेगळे आहे. मला वाटते की बॉलीवूडमधील आजवरच्या काही सर्वात मोठ्या खलनायकांच्या ऊर्जेसारखीच ऊर्जा या इब्लिसच्या पात्रात आहे. सायंतनी घोषसोबत पुन्हा काम करताना मला आनंद वाटत आहे. सेट्सवर आम्ही यापूर्वीच एकमेकांसासोबत खूपदा चर्चा केली आहे. असा काही अविस्मरणीय परफॉर्मन्स करावा की त्याची छाप प्रेक्षकांवरून कधीही मिटू नये, असे माझे ध्येय आहे. या मालिकेच्या माध्यमातून मी सोनी सबसोबत पहिल्यांदाच जुळतोय. सोनी सब परिवाराचा भाग बनणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

Web Title: The actor made his entry in 'Alibaba 2' and will be seen in a negative role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.