Bigg Boss OTT 3मध्ये टेलिव्हिजनवरील या अभिनेत्याची एंट्री, पोस्टर शेअर करून दिली हिंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 15:40 IST2024-06-20T15:36:53+5:302024-06-20T15:40:35+5:30
Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

Bigg Boss OTT 3मध्ये टेलिव्हिजनवरील या अभिनेत्याची एंट्री, पोस्टर शेअर करून दिली हिंट
'बिग बॉस ओटीटी ३' (Bigg Boss OTT 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्याच वेळी, निर्माते देखील सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये चर्चा कायम ठेवण्यासाठी दररोज काहीतरी नवीन सादर करत आहेत. आता स्पर्धक वडा पाव गर्ल म्हणजेच चंद्रिका दीक्षित आणि रॅपर नेझी नंतर, बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोच्या तिसऱ्या स्पर्धकाबद्दल हिंट दिली आहे. लवकरच शोमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्याची जिओ सिनेमाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर झलक शेअर केली आहे.
जिओ सिनेमाच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'बिग बॉस ओटीटी ३'च्या तिसऱ्या स्पर्धकाची झलक शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. फोटोत एक हॅण्डसम हंक दिसत आहे. दुसऱ्या फोटोत, टेलिव्हिजन शोच्या मुख्य अभिनेत्याचा अस्पष्ट फोटो दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यासाठी सज्ज असलेल्या या हॅण्डसम टीव्ही सेलिब्रिटीचे नाव सांगा?'
या टीव्ही अभिनेत्याची पाहायला मिळाली झलक
'बिग बॉस ओटीटी ३'च्या तिसऱ्या स्पर्धकाची झलक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. चाहते वेगवेगळ्या टीव्ही कलाकारांच्या नावांचा अंदाज घेऊ लागले. त्यांच्यापैकी अनेकांनी असा अंदाज लावला की हा टीव्ही अभिनेता साई केतन राव आहे जो 'मेहंदी है रचने वाली', 'चाशनी' आणि 'इमली' सारख्या मालिकेत काम केले आहे. 'बिग बॉस OTT 3' ची तिसरा स्पर्धक म्हणून साई केतन रावचे नाव समोर आले आहे.
पहिल्या दोन स्पर्धकांची झलक
'बिग बॉस ओटीटी ३'च्या निर्मात्यांनी यापूर्वी दोन स्पर्धकांची झलक शेअर केली होती. पहिली महिला स्पर्धक रस्त्यावर वडा पाव विकताना दिसली आणि चाहत्यांनी असा अंदाज लावला की ती दुसरी तिसरी कोणी नसून दिल्लीची वडा पाव गर्ल म्हणजेच चंद्रिका दीक्षित आहे. निर्मात्यांनी आणखी एक झलक शेअर केली, ज्यामध्ये एक माणूस रस्त्यावर टोपी घातलेला दिसत होता. चाहत्यांनी असा अंदाज लावला की दुसरा स्पर्धक रॅपर नेझी आहे जो झोया अख्तर आणि रणवीर सिंगच्या 'गली बॉय'साठी लोकप्रिय आहे.