'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीनं मालिकेतून घेतला ब्रेक, आलं मोठं कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 11:29 AM2022-12-30T11:29:43+5:302022-12-30T11:30:12+5:30
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. दरम्यान मालिकेतील एक कलाकार ब्रेकवर गेल्याचे समजते आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान या मालिकेतील एका कलाकाराने ब्रेक घेतला आहे. ही कलाकार म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मधुराणीने ब्रेक घेण्यामागचे कारणदेखील समोर आले आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या सुट्टीवर असून ती आणि तिची लेक व्हॅकेशनला गेले आहेत. खुद्द तिनेच ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मधुराणीने एअरपोर्टवर लेकीसोबत सेल्फी काढला आणि हा सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, आई लेकीचा व्हॅकेशन टाईम. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ती कुठे गेली हे तिने सांगितले नव्हते.
दरम्यान मधुराणीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती नदीच्या किनारी उभी दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअऱ करत लिहिले की, कावेरी नदी, किती सुंदर...! मधुराणीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. याशिवाय मधुराणीने लेकीसोबतचे सेल्फी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यात ते वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहेत.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.