'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 04:20 PM2022-02-11T16:20:45+5:302022-02-11T16:21:25+5:30

Chala Hawa Yeu Dya: चला हवा येऊ द्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या शोमधील एका कलाकाराने मालिका सोडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

The artist fell out of 'Chala Hawa Yeu Dya', a shocking reason | 'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण

'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी शो चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या शोमधून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (Sagar Karande) हे कलाकार घराघरात पोहचले. हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. दरम्यान या शोमधून सागर कारंडे बाहेर पडल्याची चर्चा आहे. 

सातत्याने नवनवीन प्रयोग आणि वेगळ्या विषयाचे कथन चला हवा येऊ द्या शोच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे या शोचा टीआरपीदेखील खूप चांगला आहे. चला हवा होऊ द्या या शोला प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यामुळे हा शो पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. भारत गणेशपुरे हा आपल्या विदर्भीय बोली भाषेने सगळ्यांना आकर्षित करत असतो. तर श्रेया बुगडे ही देखील अतिशय खुमासदार पद्धतीने अभिनय सादर करत असते. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा अभिनय तर प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. 


चला हवा येऊ द्या शो मध्ये सागर कारंडे हादेखील उत्तमरित्या काम करताना दिसत असतो. मात्र, आता सागर कारंडे याने शो सोडला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे सागर सध्या ‘ही तर फॅमिली ची गंमत आहे’ या नाटकामध्ये काम करताना दिसतो आहे, तर त्याचे ‘इशारो इशारो में’ हे नाटक देखील सध्या लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे एकाच वेळेस त्याला सगळीकडे लक्ष देता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे त्याने शो सोडल्याची निव्वळ चर्चा आहे. त्यामुळे शोमध्ये सागर कारंडे पाहायला मिळणार आहे नक्की!

Web Title: The artist fell out of 'Chala Hawa Yeu Dya', a shocking reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.