प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 14:53 IST2025-01-30T14:52:19+5:302025-01-30T14:53:40+5:30

Tejashree Pradhan And Swarda Thigale: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून काही दिवसांपूर्वी तेजश्री प्रधान बाहेर पडली. त्यानंतर तिच्या जागी स्वरदा ठिगळेची वर्णी लागली.

The audience wants the old Mukta, netizens react angrily to the promo of the series 'Premachi Goshta' | प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

प्रेक्षकांना हवीय जुनीच मुक्ता, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली. पात्र, कथानक, टर्न्स आणि ट्विस्टमुळे मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले.   या मालिकेतील मुक्ता, सागर आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. मालिकेत मुक्ताची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) साकारत होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिने अचानक मालिका सोडली. तिने मालिका का सोडली, या मागचे कारण समजू शकले नाही. तेजश्रीच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale)हिची वर्णी लागली. मात्र मालिकेत झालेल्या या बदलामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. त्यांना पूर्वीचीच मुक्ता हवी आहे. सोशल मीडियावर नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यात पाहायला मिळत आहे की, सावनी बोलताना दिसते की, अॅग्रीमेंटमध्ये जे लिहिलंय त्याप्रमाणे आदित्यची कस्टडी तुम्हाला दिल्याच्या बदल्यात सई माझ्याकडे राहिल. सावनी सईचा हात पकडून खेचून नेते. तेव्हा सऊ सावनीच्या हाताला चावून मुक्ताकडे येते. त्यावर मुक्ता सईला मिठी मारत म्हणते की, हा एक कागदाचा तुकडा माझ्या या काळजाच्या तुकड्याला कधीच वेगळे करु शकणार नाही. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकरी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मालिकेच्या प्रोमोवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. त्यावर बरेच जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, या सीनमध्ये तेजश्री असती तर हा सीन किती इमोशनल झाला असता. यात अजिबात इमोशन्स नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, तेजश्री असती तर खूप छान झाले असते. आणखी एकाने लिहिले की, तेजश्री पाहिजे. एका नेटकरीने म्हटले की, कोणीच तेजश्रीला रिप्लेस करू शकत नाही. ती नाही तर मालिका पाहण्याची इच्छाच होत नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, स्वरदाला १%ही जमत नाही आहे. तेजश्री प्रधान सारखा अभिनय करायला आणि म्हणूनच आम्हाला तिच मुक्ता हवी आहे. नवीन नाही. परत आणा त्याच मुक्ताला प्लीज लवकरात लवकर.   

Web Title: The audience wants the old Mukta, netizens react angrily to the promo of the series 'Premachi Goshta'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.