'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ठरला ब्लॉकबस्टर; सदस्यांना मिळणार मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:09 AM2024-09-23T10:09:00+5:302024-09-23T10:09:48+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सुरू होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. सीझनने नवव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. गेले ५७ दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत.

The fifth season of 'Bigg Boss Marathi' turned out to be a blockbuster; Members will get a big shock | 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ठरला ब्लॉकबस्टर; सदस्यांना मिळणार मोठा धक्का

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन ठरला ब्लॉकबस्टर; सदस्यांना मिळणार मोठा धक्का

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सुरू होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत. सीझनने नवव्या आठवड्यात प्रवेश केला आहे. गेले ५७ दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहेत. आजच्या भागात 'बिग बॉस' घरातील सदस्यांसोबत संवाद साधताना दिसून येतील.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये,'बिग बॉस मराठी'च्या घरातील आठही सदस्य गार्डन एरियामध्ये जमलेले दिसत आहेत. दरम्यान 'बिग बॉस' म्हणत आहेत,"हा सीझन खऱ्या अर्थाने ठरला ब्लॉकबस्टर सीझन". त्यानंतर घरातील सर्व सदस्य 'भाऊचा धक्का' या सुपरहिट गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. 'बिग बॉस' पुढे म्हणत आहेत,"...आणि आता मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे". 'बिग बॉस' आज काय महत्त्वाची घोषणा करणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घोषणेनंतर सदस्यांना सुखद धक्का बसणार की त्यांच्यावर नवीन संकट येणार हे जाणून घेणे कमालीचे ठरेल.

अरबाज पटेल पडला घराबाहेर
काल बिग बॉस मराठीमधून वैद्यकीय कारणास्तव संग्राम चौगुले घराबाहेर गेले. त्यानंतर आज घरात या आठवड्यातलं दुसरं एलिमिनेशन पार पडलं. यामध्ये अरबाज पटेलला बिग बॉस मराठीचं घर सोडावं लागलं आहे. या आठवड्यात वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी आणि सूरज चव्हाण हे पाच जण नॉमिनेट होते. यापैकी अरबाजला प्रेक्षकांची कमी मतं मिळाल्याने बिग बॉस मराठीमधून बाहेर जावं लागलं आहे.

या दिवशी पार पडणार ग्रॅण्ड फिनाले
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. नेहमी बिग बॉस मराठीचा शो १०० दिवस चालतो. पण आता शो ७० दिवसात बंद होणार असल्याचे सांगितले जातंय.  म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रॅण्ड फिनाले पार पडणार आहे, अशी चर्चा रंगलीय. मात्र याबद्दल अद्याप वाहिनीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

Web Title: The fifth season of 'Bigg Boss Marathi' turned out to be a blockbuster; Members will get a big shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.