कपिल शर्माच्या शोमुळे मिळाली प्रसिद्धी, आता रस्त्यावर विकतोय कांदे, अभिनेत्याचा फोटो बघताच चाहत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:51 IST2025-02-20T14:50:15+5:302025-02-20T14:51:34+5:30
सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता रस्त्यावर कांदे विकताना दिसत आहे.

कपिल शर्माच्या शोमुळे मिळाली प्रसिद्धी, आता रस्त्यावर विकतोय कांदे, अभिनेत्याचा फोटो बघताच चाहत्यांना धक्का
अनेक सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीचं पर्सनल लाइफ कसं आहे. ते अभिनयाव्यतिरिक्त काय करतात, हे जाणून घेण्यात चाहत्यांनाही रस असतो. सध्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता रस्त्यावर कांदे विकताना दिसत आहे.
रस्त्यावर ट्रकमधून कांदे विकताना दिसणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. फोटोत दिसणारा हा अभिनेता एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. कपिल शर्माच्या शोमधून या अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुनील ग्रोव्हर आहे. सुनील ग्रोव्हरने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
सुनील ग्रोव्हरने याआधीही अनेकदा असे फोटो शेअर केले होते. पावसाळ्यात तो रस्त्यावर छत्री आणि कणीस विकताना दिसला होता. सुनीलला ‘द कपिल शर्मा शो’मुळे प्रसिद्धी मिळाली. त्याने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. सुनील ग्रोव्हरने हिंदीबरोबरच अनेक गुजराती मालिकांमध्येही काम केलं आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘मै हूं ना’, ‘गजनी’, ‘हिरोपंती’, ‘बाघी’, ‘गब्बर इज बॅक’, 'जवान' या चित्रपटांत तो दिसला होता.