'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत फुलतंय आकाश आणि वसूमध्ये प्रेमाचं नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:15 PM2024-04-20T13:15:47+5:302024-04-20T13:16:22+5:30
Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या आकाश आणि वसूच्या नात्यात खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे.
'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, आकाश आणि वसूची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावताना दिसते आहे. मालिकेत सध्या आकाश आणि वसूच्या नात्यात खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान आता आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे.
आकाशला वसुंधराला भेटून मनातलं सगळं बोलायचं आहे, वसुच्या मनातही तेच आहे. पण आकाश ज्या हॉटेलमध्ये वसुंधराला भेटायला बोलवतो ते हॉटेल त्याला काही चांगलं वाटत नाही, आकाश वसुंधराला फोन करण्याचा प्रयत्न करतो पण वसूसोबत बोलणं होत नाही. आकाश तिथून निघेपर्यंत वसुंधरा त्या हॉटेलवर पोहोचते आणि तिथला माहोल बघून तिचा गैरसमज होतो आणि ती आकाशवर चिडते आणि इतक्यात त्या हॉटेलवर पोलिसांची धाड पडते.
आकाशची कमिशनर बरोबर ओळख असल्यामुळे पोलिसांकडून त्यांची सुटका होते. वसु आकाशवरती खूप भडकते. ती घराच्या दिशेने चालत निघते. वसुंधरा आता आकाशची जबाबदारी असल्याने तो तिच्या मागे जाऊन तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू त्या दोघांमध्ये एक नवीन नाते निर्माण होत आहे. वसुला ही कुठे ना कुठे या नवीन नात्याची जाणीव होतेय. पण वसुंधरा आकाशचे ऐकून घेईल का? आकाश-वसूमधले गैरसमज दूर होतील का? साखरपुड्याच्या दिवसापासून आकाशने, वसुंधराची जबाबदारी समजून तिला आपल्या आयुष्यात महत्वाची जागा दिली आहे. आता प्रेक्षकांना वेध लागलेत ते आकाश आणि वसुंधराच्या लग्नाचे. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.