'रंग माझा वेगळा'मध्ये नवीन ट्विस्ट, दीपाच्या आयुष्यात घडणार ही मोठी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:53 PM2022-03-03T12:53:14+5:302022-03-03T12:53:38+5:30
Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या आठवड्यातही याच मालिकेने बाजी मारली आहे. रंग माझा वेगळा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. त्यात आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. दीपाचा नेहमी राग करणारी आणि तिच्याविरोधात कटकारस्थान करणारी राधाई तिची माफी मागणार आहे. त्यामुळे दीपासाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत सध्या श्वेता प्रेग्नेंट आहे. तर दुसरीकडे आयशा दीपाने कार्तिकपासून लांब राहावे म्हणून कटकारस्थान करत आहेत. या कटकारस्थानात आयशाला श्वेताची साथ मिळते आहे. राधा आईला नुकतेच श्वेता आयशासोबत दीपाच्या आयुष्यात कट करत असल्याचे समजते. आयशाने दीपाच्या कार्तिकी डायट कंपनीची पहिली ऑर्डर घेऊन जाणारा टेम्पो जाळतात आणि तिची ऑर्डर जात नाही. त्यामुळे तिला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यात कार्तिकीलाही शाळेतून फी भरण्यासाठी नोटीस पाठवली जाते. श्वेता राधा आईला सांगते की आम्हाला दीपाला पूर्ण बर्बाद करायचे आहे. मात्र कुठेतरी राधा आईला श्वेताचे हे वागणे पटत नाही आहे. त्यामुळे मागच्या वेळच्या प्रमाणे राधा आई ही गोष्ट सौंदर्याला सांगेल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
दरम्यान, दीपाचा नेहमी राग करणारी राधा आई आता तिची माफी मागणार असल्याचे समजते आहे. राधा आईला तिच्या कृत्याचा पश्चाताप होणार आहे. ती दीपाची माफी मागणार आहे आणि इतकेच नाही तर त्या दोघी श्वेता आणि आयशाला धडा शिकवणार आहेत. तसेच श्वेताची गरोदरपणात काळजी घेण्यासाठी राधा आईच दीपाला ईनामदारांच्या घरी घेऊन येणार आहे. त्यामुळे पुढील भागात काय काय घडणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.