'विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी...', किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 12:44 PM2023-07-05T12:44:48+5:302023-07-05T12:45:31+5:30

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)मधून घराघरात पोहचलेला अभिनेते किरण माने (Kiran Mane) सातत्याने चर्चेत येत असतात.

'The scorpion will get tired, its poison will run out but I...', Kiran Mane's post is in discussion | 'विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी...', किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

'विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी...', किरण मानेंची ती पोस्ट चर्चेत

googlenewsNext

बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)मधून घराघरात पोहचलेला अभिनेते किरण माने (Kiran Mane) सातत्याने चर्चेत येत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असून ते या माध्यमातून व्यक्त होत असतात. बऱ्याचदा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येत असतात. दरम्यान आता त्यांनी त्याच्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. 

किरण मानेंनी त्यांच्या मित्रासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की,...मायणीत देशमुख गल्लीत चंद्राआज्जी होती. हरीभाऊ देशमुखांची आई. गावात कुणालाही विंचू चावला की पहिलं त्याला पळवत चंद्राआज्जीकडं आणायचे... विंचू चावलेला माणूस भडक्यानं अक्षरश: बोंबलत असायचा...आज्जीकडं एक झाडपाल्याचं 'औषध' असायचं ! दहा मिन्टात माणूस खडखडीत बरा होऊन, हसत-हसत घरी जायचा ! चंद्राआज्जीची माझ्यावर लै माया ! 'माने सायबाचं लेकरु' म्हणत जवळ घ्यायची. मी तिला एकदा या झाडपाल्याचं 'शिक्रेट' विचारलं... "कुनाला सांगू नको" म्हनत तिनं सांगायला सुरूवात केली...

"माजं नुक्तंच लगीन झाल्यालं. कारभार्‍याला जेवन घिवून रानात चाल्लेवते. मोट्टा पाऊस आला. येका झाडाखाली आडोशाला थांबले. फांदीवर कायतर हाल्ल्यागत दिसलं. बगीतलं तर इच्चू आन् सरड्याची भांडनं चाल्लीवती... इच्चू लै खवाळल्याला. सरड्याला नांगी मारायचा. सरडा सारसारसार फांदीवर जायचा, त्या झाडाचा पाला खायचा आन् परत यिवून इचवाला डिवचायचा... परत इच्चू नांगी मारायचा. परत सरडा झाडावरचा पाला खाऊन तरतरीत हून परत इचवाफुडं जाऊन उभा र्‍हायाचा..."...हा खेळ बघून आज्जीला त्या झाडपाल्यातल्या 'औषधी गुणांचा' शोध लागला होता, असे मानेंनी पोस्टमध्ये म्हटले.

माझ्यावर माझ्यापेक्षा जास्तच विश्वास आहे त्यांचा

ते पुढे म्हणाले की, ...परवा एका युट्यूबरनं मुलाखतीत मला प्रश्न विचारला : "किरणसर, अभिनयक्षेत्रात स्ट्रगल करताना तुमच्यावर अनेक खचवणारे, अपमानीत करणारे जिवघेणे प्रसंग आले. तरीही आम्हाला तुम्ही हसतमुखाने आणि भक्कमपणे उभे असलेले दिसता. यश, मानसन्मान मिळवलं. तुम्हाला लोकप्रियताही मिळाली. हे कसं जमलं?" मी मिनिटभर शांत झालो. थोडा विचार केला. मलाच कळेना हे कसं शक्य होतं असेल? मुळात हा संघर्ष मला इतका अंगवळणी पडलाय की... पण अचानक मला चंद्राआज्जीचा तो किस्सा आठवला. मग मला जाणवलं की अशावेळी माझ्या पाठीशी एक भक्कम ताकद उभी रहाते, ती म्हणजे 'माझी जिवातली माणसं' ! माझ्यावर माझ्यापेक्षा जास्तच विश्वास आहे त्यांचा.

या मित्रांमध्ये सगळ्यात आधी नांव येतं ते माझा जिवलग मित्र सुनिल कारखानीस याचं ! सुनिलनं माझ्यासाठी काय केलंय, हे सांगायची ही वेळ नाही. एका स्पेशल दिवशी मी ते सविस्तर सांगेन... आत्ता आज मी फक्त एवढेच म्हणेन की, "मुंबईसारख्या महानगरीत अभिनयक्षेत्रात संघर्ष करत असताना, परिस्थितीचा 'विंचू' मला वारंवार नांगी मारत असताना, सुनिल हा माझ्या मेंदूतला-मनातला भडका शांत करणारा, मला बळ देणारा, मला हसतमुख ठेवणारा, माझा 'झाडपाला', माझं 'औषध' आहे ! माझा मित्र सुनिल कारखानीस !" सुन्या, तुझ्यासारखे मित्र आहेत म्हणून मी आहे ! विंचू थकेल, त्याच्यातलं विष संपेल पण मी थकणार-संपणार नाही, पुन:पुन्हा ताठ मानेनं उभा राहिन, असे म्हणत किरण मानेंनी त्यांच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: 'The scorpion will get tired, its poison will run out but I...', Kiran Mane's post is in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.