'गाथा नवनाथांची' मालिकेनं गाठला ५०० भागांचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:38 IST2022-12-28T18:38:03+5:302022-12-28T18:38:43+5:30
आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले.

'गाथा नवनाथांची' मालिकेनं गाठला ५०० भागांचा टप्पा
सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. गाथा नवनाथांची मालिका आता ५०० भागांचा टप्पा पार करत आहे.
आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. आता मालिकेत राजपुत्र कृष्णधर याचा चौरंगीनाथ होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. मालिकेत लवकरच चौरंगीनाथ पाहायला मिळतील. राजपुत्राचा जन्म कसा झाला आणि त्यांचे चौरंगीनाथ हे रूपांतर कसे होणार, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.
आत्तापर्यंतच्या नाथांचा प्रवास आणि पुढील वाटचाल यांत मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, नाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला म्हणून सेट वर सेलेब्रेशन देखील करण्यात आले. त्या वेळी संपूर्ण टीम ने एकत्र येऊन ५०० भागांचा हा टप्पा एकत्रित रित्या साजरा केला.