'मन उडू उडू झालं' मालिका TRPमुळे नाही तर या कारणामुळे घेतेय प्रेक्षकांचा निरोप, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:46 PM2022-07-13T13:46:57+5:302022-07-13T13:47:20+5:30
Man Udu Udu Zhala: 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजते आहे.
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन उडू उडू झालं (Man Udu Udu Zhala) कमी कालावधीत चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी आहे. येत्या काही दिवसात ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजते आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतून कानविंदे कुटुंबातील नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे यांची मालिकेतून एक्झिट करण्यात आली. या तिघांच्या पाठोपाठ बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर यांनीदेखील मालिकेतून निरोप घेतला आहे. नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आले. ही मालिका निरोप घेणार असल्याचे समजताच प्रेक्षकांना धक्का बसला आहे. टीआरपी घसरल्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची चर्चा आहे. मात्र हे कारण नसून नवीन कारण समोर आले आहे.
मन उडू उडू झालं या मालिकेत सध्या दीपू आणि इंद्राच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात येत आहे. या लग्नाच्या सिक्वेन्सनंतर ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. मालिकेत इंद्रा हा पुन्हा त्याच्या घरी राहायला गेला आहे, असे दाखवण्यात आले आहे. तर दुसरीकडे दीपूच्या बाबांनी इंद्राला एक संधी दिली आहे आणि तो त्याची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे कार्तिक आणि सानिका इंद्राला आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व संकटावर मात करुन इंद्रा आणि दीपूचं लग्न लवकरच होणार असल्याचे मालिकेच्या ट्रॅकवरुन पाहायला मिळत आहे.
मन उडू उडू झालं ही मालिका टीआरपी घसरल्यामुळे ऑफ एअर जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता नवीन कारण समोर आले आहे. टीआरपीमुळे ही मालिका बंद होत नसून कलाकारांच्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग १३ किंवा १४ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे.
मन उडू उडू झालं या मालिकेच्या जागी आता नवी मालिका प्रसारित होणार आहे. ‘तू चाल पुढं’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.