थिएटर कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवतो-अक्षया देवधर

By अबोली कुलकर्णी | Published: September 4, 2018 05:21 PM2018-09-04T17:21:40+5:302018-09-04T17:22:12+5:30

राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले.

Theater keeps the artist alive as a man-Akshay Devdhar | थिएटर कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवतो-अक्षया देवधर

थिएटर कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवतो-अक्षया देवधर

googlenewsNext

राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. कोल्हापूरात मालिकेची शूटिंग होत असले तरीही मुंबईची ओढ ही कायम असते, असे मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणते. मालिकेत तिने साकारलेली शिक्षीकेची भूमिका आणि एकं दरितच तिच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

 * तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची तुला आॅफर आली तेव्हा तुझी रिअ‍ॅक्शन काय होती? त्याशिवाय झी मराठीसारखं एवढं मोठं बॅनर?
- नक्कीच खूप आनंद झाला. झी मराठीसारखं एवढ्या मोठ्या बॅनरची आॅफर आली म्हटल्यावर मला खूप आनंद झाला. तेवढंच दडपण देखील आलं. मात्र, मालिकेची टीम एवढी चांगली आहे की, मला बिल्कुल जाणवलं नाही की, मी एवढ्या मोठया टीम आणि वाहिनीसोबत काम करत आहे. 

 * तुझ्यात जीव रंगलाच्या सध्याच्या ट्रकविषयी काय सांगशील?
- सध्या सुरू असलेला ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आहे. राणा आता मुंबईत मॅनेजरबार्इंच्या सांगण्यावरून कुस्तीची ट्रेनिंग घेतो आहे. मॅनेजरबाई जेव्हा वाड्यावर येतात तेव्हा राणा आणि तिच्यात वाढलेली जवळीक अंजलीला दिसून येते. आता पुढे काय? याची उत्तरं प्रेक्षकांना पडद्यावरच मिळतील.

 * टीमबद्दल काय सांगशील? कसे असते सेटवरचे वातावरण?
- आम्ही कोल्हापूरातच मालिकेचे शूटिंग करतोय. सेटवरचे वातावरण खूप मस्त असते. कोल्हापूरची माणसं खूपच लाघवी आणि मनमिळाऊ आहेत. मुंबईत कधीच कळत नाही की, आपण एवढ्या सुंदर लोकांपासून दूर आहोत. आमची टीम पण खूप छान आहे. खूप शिकायला मिळतंय. अनुभव समृद्ध होत आहे. 

 * तू मालिकेत एका शिक्षीकेची भूमिका साकारतेस. तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील आवडत्या शिक्षिकेबद्दल काय सांगशील?
- होय, खरंतर तसं सांगणं फार कठीण आहे. कारण शिक्षक आपल्या आयुष्याला आकार देत असतात. मला शिक्षिकेची भूमिका करायला मिळतेय हे खºया अर्थाने माझं भाग्यच म्हणावं लागेल. 

 * अभिनयक्षेत्रात करिअर करायचं असं केव्हा ठरवलंस?
- मला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतंच. मला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. मला संधी मिळाली अन् मी संधीचं सोनं करायला ठरवलं.

 * मालिकेत तू साडी याच आऊटफीटमध्ये जास्त दिसतेस. तुला स्वत:ला ट्रेडिशनल लूक आवडतो की वेस्टर्न?
- ट्रेडिशनल लूक़ कारण आपली संस्कृती आणि संस्कारांशी निगडित राहणं मला आवडतं. सुदैवाने मला मालिकेत साडी हा आऊटफिट देण्यात आला आहे, याबद्दल चांगलेच वाटते.

 * तू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेस. इन्स्टाग्रामवर तुझे ५ लाख फॉलोअर्स आहेत. काय सांगशील? कसं वाटतं एवढं प्रेम मिळतं चाहत्यांकडून?
- खूप छान वाटतं. खरंतर मला असं वाटतं की, एवढ्या सगळया उलाढाली ज्या चालू आहेत त्या प्रेक्षकांच्या प्रेमासाठीच असं मला वाटतं. मी कायम माझ्या चाहत्यांसोबत कनेक्टेडच राहते. 

 * तू थिएटर केलं आहेस. कलाकाराच्या आयुष्यात थिएटरचं किती महत्त्व असतं?
- थिएटरच कलाकाराला खऱ्या  अर्थाने घडवतात, असं म्हणायला हरकत नाहीये. मी खूप शिकलेय. थिएटरमुळे खूप समृद्ध झाले आहे. कलाकाराला माणूस म्हणून जिवंत ठेवायला थिएटरची भूमिका महत्त्वाची आहे. 

 * अभिनय तुझ्यासाठी काय आहे?
- अभिनय माझ्यासाठी मजा आहे. मी एन्जॉय करत कॅमेऱ्यासमोर अभिनय साकारते. प्रत्येक छोटया गोष्टीतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते. 

 * कम्फर्ट झोनमध्येच काम करायला तुला आवडेल की काही वेगळया प्रकारांतही तू काम करणार आहेस? 
- मला असं वाटतं की, मी आता कम्फर्ट झोनच्या बाहेरही काम केलं पाहिजे. पण, आता मी सध्या अंजलीची भूमिका एन्जॉय करतेय, तीच मला चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर सादर करायचीय. त्यानंतर मी एखाद्या वेगळ्या भूमिकेचा विचार करेन.

Web Title: Theater keeps the artist alive as a man-Akshay Devdhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.