चिमुकली ‘फुलवा’ आठवतेय? आता दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 08:00 IST2020-08-18T08:00:00+5:302020-08-18T08:00:01+5:30
आत्ताचे फोटो पाहून हीच फुलवा आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

चिमुकली ‘फुलवा’ आठवतेय? आता दिसते इतकी ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल थक्क
2011 साली कलर्स वाहिनीवरची ‘फुलवा’ ही मालिका आठवतेय? आणि या मालिकेत फुलवाची व्यक्तिरेखा साकारणारी ती चिमुरडी? ही फुलवा म्हणजे, जन्नत जुबैर रहमानी. आता फुलवा चांगलीच मोठी झाली आहे. शिवाय तितकीच सुंदर आणि ग्लॅमरस. तिचे आत्ताचे फोटो पाहून हीच फुलवा आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
जन्नत आता 18 वर्षांची आहे. वयाच्या 9 व्या वर्षांपासून बालकलाकार म्हणून तिने काम करायला सुरुवात केली. 2010 साली ‘दिल मिल गये’ या मालिकेत ती बालकलाकार म्हणून झळकली होती. यात तिने तमन्नाची भूमिका साकारली होती. यानंतर ‘काशी - अब ना रहे तेरा कागज कोरा’, ‘मट्टी की बन्नो’ या मालिकेत तिने काम केले. पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती 2011 साली आलेल्या ‘फुलवा’ या मालिकेने.
यानंतर जन्नतने अनेक मालिकांमध्ये काम केले. आशिकी, इश्क में मरजवां, कर्मफल दाता शनि आणि सावधान इंडिया सहित अनेक सिरियल्समध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. पाठोपाठ मोठ्या पडद्यावरही ती झळकली.
हिचकी, एक थी डायन आणि लव का द एंड सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले.
जन्नत सोशल मिडियावर प्रचंड अॅक्टिव आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1 करोड 80 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
टिकटॉक सुरु होते तेव्हा टिकटॉक स्टार म्हणूनही ती लोकप्रिय झाली होती. टिकटॉकवरचे तिचे मजेदार आणि क्यूट व्हिडीओ क्षणात व्हायरल होत. टिकटॉकवर तिचे 2 करोड 80 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते.
जन्नतला एक भाऊ देखील आहे. आयन जुबैर. आपल्या बहिणीप्रमाणेच तो देखील टीव्हीवर एक बालकलाकार म्हणून काम करतो. जन्नत आपल्या छोट्या भावासोबत देखील अनेक मजेदार व्हिडिओ बनवून शेयर करत असते.