"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 10:24 AM2024-10-07T10:24:43+5:302024-10-07T10:25:27+5:30
Shilpa Shirodkar : अभिनेत्री शिल्पा शिरोडकर बिग बॉस १८च्या घरात दाखल झाली आहे.
सलमान खान(Salman Khan)चा लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस १८' (Bigg Boss 18) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कालच सलमान खानने 'बिग बॉस १८'च्या स्पर्धकांची ओळख करून दिली. या यादीत मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर(Shilpa Shirodkar)चेही नाव आहे. 'बिग बॉस १८'च्या घरात येण्यापूर्वी शिल्पा शिरोडकर सलमान खानसोबत खूप मस्ती करताना दिसली. एकूणच शिल्पा शिरोडकर 'बिग बॉस १८' च्या घरात खूप आनंदी दिसत होती. मात्र, एकेकाळी शिल्पा शिरोडकरला इंडस्ट्रीत खूप मनस्ताप झाला आहे. शिल्पा शिरोडकरकडे काम नसल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याचा खुलासा खुद्द शिल्पा शिरोडकरने केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिरोडकर म्हणाली, मला आता बिग बॉसची ऑफर मिळाली आहे. खरं तर मी खूप दिवसांपासून कामाच्या शोधात होतो. इंडस्ट्रीत कोणीही मला काम द्यायला तयार नव्हते. लोकांनी माझे कॉल उचलणे बंद केले होते. लोक मला म्हणायचे की त्यांच्याकडे माझ्यासाठी योग्य भूमिका नाहीत. मी एक कलाकार आहे आणि मला कामाची गरज आहे. मला बिग बॉससारख्या शोमध्ये काम करायलाही काही अडचण नाही.
बिग बॉसची मी खूप मोठी चाहती
शिल्पा शिरोडकरने पुढे सांगितले, लोक बिग बॉस १८ सारख्या शोकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. मला फक्त अधिकाधिक काम करायचे आहे. मी इथे फेक बनण्यासाठी आले नाही. एक काळ असा होता की तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं. खरं सांगू, मी बिग बॉसची खूप मोठी चाहती आहे. मी आणि माझी मुलगी हा कार्यक्रम अनेकदा पाहायचो. मी बिग बॉसमध्येही काम केले पाहिजे, असे माझ्या मुलीचे मत होते. अशा परिस्थितीत जेव्हा मला ऑफर आली तेव्हा मी नकार दिला नाही.