'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:07 PM2021-10-06T12:07:21+5:302021-10-06T12:07:55+5:30

'आई कुठे काय करते' मालिका सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

There is a demand to stop the series 'Aai Kuthe Kay Karte', for this reason the series becomes a troll | 'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल

'आई कुठे काय करते' मालिका बंद करण्याची होतेय मागणी, या कारणामुळे मालिका होतेय ट्रोल

googlenewsNext

'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. इतकेच नाही तर या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. मात्र सध्या ही मालिका नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. मालिकेत अरूंधतीचा प्रेमळ आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव सर्वांनाच आवडत असला तरी सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक प्रेक्षकांना फारसे पटत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मालिकेला विरोध होताना दिसत आहे. 

आई कुठे काय करते मालिकेविरोधात प्रेक्षक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आता ही मालिका बंद करा, काय फिरवली आहे मालिका, कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहे.


आई कुठे काय करते ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत दाखवण्यात येणारे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नसल्याचे दिसत आहे. मालिकेतील कथानकामुळे मुख्य भूमिकेत असणारी अरुंधती युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे.

संजना आणि अनिरुद्ध यांचे लग्न होऊनही अरुंधती त्याच घरात राहत आहे. आजी आणि आप्पा यांच्यासाठी अरुंधती तिथे राहत असली तरी प्रेक्षकांना ते खटकत आहे. आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत एकाच घरात राहणे कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला आवडणार नाही असे प्रेक्षकांचे मत आहे. याही पलीकडे म्हणजे अरुंधती संजनाला मदत करताना दिसत आहे. त्यामुळे अरुंधतीच्या या स्वभावावर देखील प्रेक्षकांकडून टीका होते आहे. तसेच संजनाच्या ऑफिसमधील प्रकरणात देखील अरूंधती तिच्या मदतीला धावली आहे. यावर एका युजरने म्हटले आहे की अरूंधती स्वत:ला लेडी जेम्स बॉन्ड समजते का? अशा काही प्रतिक्रिया येत आहेत. 


एका युजरने कमेंट करत लिहिले की, असे कुठेही होत नाही. ज्या बाईने आपला २५वर्षांचा संसार मोडला त्या बाईसोबत एकाच घरात राहणे, तिला मदत करणे, समजून घेणे. हे खऱ्या आयुष्यात घडत नाही. आणखी एका युजरने लिहिलं, ‘एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिच्याबाजूने नक्की लढा द्यावा पण इथे ती बाई चुकीची निवडली आहे. आता अरुंधती सिंगल मदर आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले की, स्त्रीवर होणार अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देतेय. मग गेली २५ वर्ष ती अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती. असे प्रश्न प्रेक्षक सोशल मीडियावर विचारत आहेत.

Web Title: There is a demand to stop the series 'Aai Kuthe Kay Karte', for this reason the series becomes a troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.