"कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होत नाही...", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:57 IST2025-02-05T16:56:45+5:302025-02-05T16:57:42+5:30

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) 'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5 ) मधून घराघरात लोकप्रिय झाली. सध्या तिची लगीनघाई सुरु आहे.

''There is delay in calculating karma, there is no mistake...'', Ankita Walawalkar's post is in the news | "कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होत नाही...", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत

"कर्माच्या हिशोबात उशीर होतो, चूक होत नाही...", अंकिता वालावलकरची पोस्ट चर्चेत

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar)  'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5 ) मधून घराघरात लोकप्रिय झाली. सध्या तिची लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती मराठी मनोरंजन विश्वातील संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्न करणार आहे. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अंकिता वालावलकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यात काही फोटो शेतातील आहेत. तसेच पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. एका फोटोत अक्कलकोटमध्ये लोकांना जेवण वाढताना दिसले. तिने फोटो शेअर करत लिहिले की, काल स्वामींच दर्शन घेऊन आलो.. मनात खूप गोष्टी होत्या..सतत वाटायचं की खोटं वगणाऱ्यांसोबत चांगलं का होतं? आपण खरं वागुन चुकीचे का वाटतो? आपल्याला मुद्दाम चुकीच का दाखवलं गेलं? पण अक्कलकोट हे एक अस स्थान आहे जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात.. एक कायम लक्षात ठेवा “कर्माच्या हिशोबात उशीर होतो,चुक होत नाही,बाकी तो बघता,तेचो लक्ष आसा”. कुणाल भगत तु माझ्या कर्माचं एक फळ.



अंकिता वालावलकरची लग्नपत्रिका ही केळीच्या पानाच्या डिझाइनची आहे. कुणाल आणि अंकिता यांची देवनागरीमध्ये नावे लिहिली आहेत. पत्रिकेला  खास कोकणी टच आहे. अंकिताने परंपरेनुसार सर्वप्रथम गावच्या मंदिरात आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली होती. तिने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: ''There is delay in calculating karma, there is no mistake...'', Ankita Walawalkar's post is in the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.