"पालक होण्यासारखा या जगात दुसरा आनंद नाही...", अभिनेत्री स्मिता बन्सलने पालकत्वावर केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 06:50 PM2023-09-26T18:50:07+5:302023-09-26T18:50:18+5:30

Smita Bansal : स्मिता बन्सल ही एक टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील ‘अमानत’, ‘आशीर्वाद’, ‘सरहदेन’ आणि सोनी सबच्या ‘अलादीन’ या चित्रपटात तिने लोकप्रिय भूमिका केल्या आहेत.

"There is no other happiness in this world like being a parent...", actress Smita Bansal comments on parenthood | "पालक होण्यासारखा या जगात दुसरा आनंद नाही...", अभिनेत्री स्मिता बन्सलने पालकत्वावर केलं भाष्य

"पालक होण्यासारखा या जगात दुसरा आनंद नाही...", अभिनेत्री स्मिता बन्सलने पालकत्वावर केलं भाष्य

googlenewsNext

स्मिता बन्सल (Smita Bansal) ही एक टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री आहे. झी टीव्हीवरील ‘अमानत’, ‘आशीर्वाद’, ‘सरहदेन’ आणि सोनी सबच्या ‘अलादीन’ या चित्रपटात तिने लोकप्रिय भूमिका केल्या आहेत. २००८ मध्ये तिने 'कर्ज' या बॉलिवूड चित्रपटातही काम केले होते. बालिका वधू मालिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा इंडियन टेली अवॉर्ड देखील मिळाला आहे. स्मिता बन्सल योग आणि प्राणायामच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्वत:ला तंदुरुस्त ठेवते. तिचा असा विश्वास आहे की तिच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हे तणावमुक्तीसाठी सर्वात उपयुक्त आहे. 

'कोटो'वरील 'डिअर मॉम्स ऑफ टीन्स' नावाच्या कम्युनिटीसाठी स्मिता बन्सलने लेख लिहिला. यात तिने किशोरवयीन मुलींसोबत पालकांना मार्गदर्शन केले. तिने म्हटले की, पालक होण्यासारखा या जगात दुसरा आनंद नाही.  अनेकांनी तुम्हाला ही बाब सांगितली आहे. मात्र नुसतं पालक होऊन उपयोगाचे नसते तर चांगले पालक होणे हे गरजेचे असते. 'कोटो' सारख्या मंचावरील समूह हे सशक्त आणि पाठबळ देणारे ठरतात. इथे आपण मुक्तपणे संवाद साधू शकतो आणि आपल्या समस्यांवर उत्तरे मिळवू शकतो. अशा मंचांवरील संवादातून खूप साऱ्या नव्या गोष्टी समजत असतात, नवे अनुभव कळत असतात आणि त्यातून आपल्या किशोरवयीन मुलीसंदर्भात आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळू शकतात. तज्ज्ञ मंडळी पालकांशी इथे संवाद साधता येतो, विशेष बाब म्हणजे इथले संभाषण हे अत्यंत निर्मळ, सशक्त आणि कोणाचीही उणी-दुणी काढण्यासाठी नसतं. इथल्या संवादामुळे आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांमुळे काळजीत पडलेल्या असंख्य पालकांची काळजी दूर होण्यास मदत होते. इथल्या संवादामुळे पालक आपल्या मुलीकडे फार चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतात आणि तिला एक उत्तम व्यक्ती, नागरीक बनविण्यासाठीही प्रयत्न करू शकतात.

सहानुभूती दाखवली पाहिजे
किशोरवयीन वर्षे हे दोन्ही पालक आणि मुलींसाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतात. अशावेळी तुम्ही तुमच्या मुलीच्या भावना आणि अनुभवांबद्दल सहानुभूतीपूर्वक आणि समजुतीने वागणे गरजेचे आहे.  मुलीचा भावनिकदृष्ट्या  गोंधळ उडालेला असताना तुम्ही तिच्यासोबत शांतपणे वागणं गरजेचे असते. तिच्याप्रती सहानुभूती दाखवली पाहिजे आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हे पालकांनी सांगितलं पाहिजे.  आपली मुलगी आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकेल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे तिने लिहिले.

 मुलींना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे
स्मिताने पुढे सांगितले की, मुलींना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याचवेळी त्यांना त्यांच्या आयुष्यात भक्कम पाठिंबा पण असला पाहिजे.पालकांनी मुलींना तिच्या वयानुसार जबाबदारी घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलींना आपण घेतलेल्या निर्णयामुळे काय परिणाम होतात हे पाहता येतात आणि त्यातून त्या शिकत असतात. हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे असते.  तिच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिला पाठिंबा दिला पाहिजे.  मुलींची काळजी घेत असताना त्यांना पाठिंबा आणि स्वातंत्र्यही देणे गरजेचे असते. जेणेकरून त्यांना स्वावंलंबी जीवनाचा मार्ग सापडण्यास मदत होईल. दरवेळी पालक हे काही मुलींचे मित्र असतातच असे नाही, तसे विनाकारण असण्याचीही गरज नाही.  मात्र वर दिलेल्या 5 मंत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या तरुण मुलीसोबतचे भावनिक, मानसिक बंध अधिक बळकट करू शकता.  हे प्रेमळ बंध बळकट झाल्याने मुली पौगंडावस्थेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा पाया बळकट झालेला असतो, ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होते आणि त्यांचा जीवनातील पुढील प्रवास सुखकर होण्यासही मदत होते.

Web Title: "There is no other happiness in this world like being a parent...", actress Smita Bansal comments on parenthood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.