​सुरभी ज्योती दिसणार कोई लौट के आया है या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2017 08:27 AM2017-02-06T08:27:46+5:302017-02-06T13:57:46+5:30

सुरभी ज्योती कबूल है या मालिकमुळे नावारूपाला आली. या मालिकेनंतर नुकतीच ती इश्कबाज या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली ...

There is no return to see Surabhi Jyoti or in the series | ​सुरभी ज्योती दिसणार कोई लौट के आया है या मालिकेत

​सुरभी ज्योती दिसणार कोई लौट के आया है या मालिकेत

googlenewsNext
रभी ज्योती कबूल है या मालिकमुळे नावारूपाला आली. या मालिकेनंतर नुकतीच ती इश्कबाज या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. यानंतर आता ती प्रेक्षकांना कोई लौट के आया है या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका एका गूढकथेवर आधारित असून अनेक रहस्य प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही रहस्य काही भागांनंतर उलगडणार आहेत. या मालिकेत सुरभी प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेद्वारे सुरभी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे या मालिकेसाठी ती सध्या खूपच तयारी करत आहे. 
या मालिकेतील कथा ही पुनर्जन्मावर आधारित आहे. अशाप्रकारच्या मालिकेमध्ये भूमिका साकारण्याची सुरभीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे सध्या या भूमिकेतील प्रत्येक बारकाव्यांचा ती अभ्यास करत आहे. तिने या मालिकेसाठी नुकतीच पुनर्जन्म ही संकल्पना समजून घेतली. तसेच आपणदेखील आपल्या पुनर्जन्माविषयी जाणून घेऊया असे तिने या मालिकेच्या निमित्ताने ठरवले आणि त्यासाठी तिने संमोहनशास्त्राची मदत घेतली. ती नुकतीच आपल्या पुनर्जन्माविषयी जाणून घेण्यासाठी एका संमोहनोपचार तज्ञ्ज्ञाकडे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर तिला खूपच भयानक अनुभव आल्याचे ती सांगते. तिला या सगळ्या गोष्टींचा इतका त्रास होईल असे तिला वाटलेच नव्हते. संमोहनोपचार तज्ज्ञाच्या खोलीतून ती अक्षरशः रडतच बाहर आली आणि त्यानंतर तिने कित्येक तास स्वतःला खोलीत बंद केले होते. या अनुभवाबद्दल सुरभी सांगते, "मला संमोहित केल्यानंतर काय घडले हे मला काही वेळासाठी कळलेच नाही. मी माझ्या अनेक निकटच्या लोकांचे मरण त्यावेळी पाहिले. ते सगळे माझ्यासाठी एक वाईट स्वप्न होते."

Web Title: There is no return to see Surabhi Jyoti or in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.