लोकप्रिय सेलिब्रिटी ‘खतरो के खिलाडी ११’मध्ये झळकणार, जाणून घ्या शोबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 01:01 PM2021-03-25T13:01:22+5:302021-03-25T13:02:15+5:30

Abu Dhabi will be new venue for Khatron ke Khiladi season 11. 'खतरों के खिलाड़ी 10' बल्गेरियात झाले होते, परंतु 11 सीझनचे शूटींग यंदा अबू धाबीमध्ये होणार आहे.

These 3 celebrities confirmed for Khatron ke Khiladi Season11, read more to know details... | लोकप्रिय सेलिब्रिटी ‘खतरो के खिलाडी ११’मध्ये झळकणार, जाणून घ्या शोबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर

लोकप्रिय सेलिब्रिटी ‘खतरो के खिलाडी ११’मध्ये झळकणार, जाणून घ्या शोबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील खतरों के खिलाडी या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता असते. बॉलीवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं ११ पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे.

त्यामुळे या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची उत्कंठा रसिकांना लागली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची संभावित नावं समोर आली आहे. 

यंदाच्या पर्वात  टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी, एजाज खान आणि वरुण सूद शोमध्ये दाखल होत आहेत.'खतरों के खिलाड़ी 11' चे शूटिंग येत्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये सुरू होईल.  'खतरों के खिलाड़ी 10' बल्गेरियात झाले होते, परंतु 11 सीझनचे शूटींग यंदा अबू धाबीमध्ये होणार आहे. 


खतरों के खिलाडी 11 'मध्ये बरीच प्रसिद्ध नावांची चर्चा आहे. यात 'कुल्फी कुमार बाजेवाला' फेम मोहित मलिक, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया, पुरु चिब्बर, एरिका फर्नांडिस, बिग बॉस 13 फेम शेफाली जरीवाला अशी नावे आहेत. अजूनतरी  या यादीवर कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


गेल्या  वर्षी करिश्मा तन्ना 'खतरों के खिलाडी 10'ची विजेती ठरली होती. यंदाच्या सीझनमध्ये कोणते 
सेलेब्रीट सहभागी होतील आणि या वेळी शोमध्ये नवीन काय असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: These 3 celebrities confirmed for Khatron ke Khiladi Season11, read more to know details...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.