​ही अभिनेत्री गिरवत आहेत इंग्रजीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 05:19 PM2016-11-18T17:19:35+5:302016-11-18T17:19:35+5:30

शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते असे म्हटले जाते. ही गोष्ट मे आय कम इन मॅडम या मालिकेतील सपना सिकरवारने सिद्ध ...

These actresses are gorgeous English lessons | ​ही अभिनेत्री गिरवत आहेत इंग्रजीचे धडे

​ही अभिनेत्री गिरवत आहेत इंग्रजीचे धडे

googlenewsNext
कण्यासाठी वयाची मर्यादा नसते असे म्हटले जाते. ही गोष्ट मे आय कम इन मॅडम या मालिकेतील सपना सिकरवारने सिद्ध केली आहे. ती सध्या इंग्रजीचे धडे घेत आहे. सपना ही मध्यप्रदेशमधील रतलाम या छोट्याशा गावातून आली आहे. ती एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली खेळाडू आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात आहे. पण तिला चांगले इंग्रजी बोलता येत नाही ही खंत तिला गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्यामुळेच तिने आता इंग्रजीचे धडे गिरवायचे ठरवले आहे.
सपनाला इंग्रजी बोललेले कळते तसेच ती काही प्रमाणात संभाषण साधूही शकते. पण अस्खलित इंग्रजी आपल्याला बोलता येत नाही याचे तिला नेहमीच वाईट वाटते. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटात श्रीदेवी उतारवयात इंग्रजी शिकते हे आपण पाहिले आहे. बहुधा तिच्याकडूनच प्रेरणा घेऊन सपनाने इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या पाच वर्षाची मुलीने तिला इंग्रजी शिकण्यास प्रोत्साहन दिले. सपना सांगते, "माझे इंग्रजी चांगले नसल्याने माझ्यासमोर कोणी इंग्रजी बोलत असल्यास मला प्रचंड टेन्शन येत असे. कोणत्या सार्वजिनक कार्यक्रमाला जायचे असल्यास मला अधिक भीती वाटायची. कोणतीही गोष्ट कोणत्याही वयात आपण शिकू शकतो याची मला खात्री आहे. त्यामुळे मी इंग्रजी शिकायचे ठरवले. मी चित्रीकरणात व्यग्र असल्याने कोणत्याही इंग्रजीच्या क्लासेसला जाणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी इंग्रजी शिकवणाऱ्यांना घरीच बोलवले. ते आठवड्यातून तिनदा माझ्या घरी येतात. लोकांशी इंग्रजीत संभाषण कसे केले पाहिजे हे मला शिकवतात. मी इंग्रजी बोलल्यास लोक माझी चेष्ठा करतील असे मला नेहमीच वाटायचे. त्यामुळेच माझ्या मुलीने केलेल्या आग्रहामुळे मी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला."

Web Title: These actresses are gorgeous English lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.