या आहेत टीव्ही अभिनेत्री ज्यांनी सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी उचलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 10:45 AM2017-09-02T10:45:54+5:302017-09-02T16:15:54+5:30

छोट्या पडद्यावर काम करणा-या अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. त्यांचं जीवन ग्लॅमरस वाटत असलं तरी त्यांनाही अनेक कठीण ...

These are TV actresses who took responsibility for children as a single mother | या आहेत टीव्ही अभिनेत्री ज्यांनी सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी उचलली

या आहेत टीव्ही अभिनेत्री ज्यांनी सिंगल मदर बनत मुलांची जबाबदारी उचलली

googlenewsNext
ong>छोट्या पडद्यावर काम करणा-या अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. त्यांचं जीवन ग्लॅमरस वाटत असलं तरी त्यांनाही अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतंच. छोट्या पडद्यावर अशाच काही अभिनेत्री आहेत ज्यांना प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत मुलांची मोठी जबाबदारी उचलली.त्यापैकी काहींनी नंतर लग्न करुन आयुष्यात सेटल होणं पसंत केलं.पाहूया कोण आहेत या अभिनेत्री.
 
श्वेता तिवारी


 
'कसोटी जिंदगी की' या मालिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाने श्वेतानं रसिकांची मनं जिंकली. रिल लाइफमध्ये श्वेता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली होती. मात्र तिच्या रियल लाइफमध्ये अनेक चढउतार घडत होते. तिच्या प्रत्यक्ष जीवनात अनेक उलथापालथ घडली ज्यामुळे तिचं आयुष्यच पालटलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात श्वेता दुस-यांदा आई बनली. रेयांश असं तिच्या मुलाचं नाव आहे. श्वेता आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांचा मुलगा आहे. याआधी श्वेताला पलक ही मुलगी आहे. राजा चौधरी आणि श्वेता यांची ही मुलगी आहे. मात्र 2007 साली राजासह झालेल्या घटस्फोटानंतर श्वेतानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तिने पलकचा एकटीने सांभाळ केला. 2013 साली श्वेतानं अभिनवसह दुसरं लग्न केलं. आता अभिनव आणि श्वेतासह पलक राहते.
 
नीना गुप्ता


 
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 1989 साली मसाबा या लेकीला जन्म दिला. वेस्ट इंडियन क्रिकेट स्टार सर विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांची लेक म्हणजे मसाबा. नीना गुप्ता आणि विवियन यांचं लग्न झालं नाही. मात्र मसाबाच्या जन्मानंतर नीना यांनीच लेकीची पूर्ण जबाबदारी उचलत सांभाळ केला. 2008 साली नीना गुप्ता यांनी दिल्लीतील एक बडा उद्योजक विवेक मेहराशी लग्न केलं.त्यावेळी मसाबा 19 वर्षांची झाली होती.
 
दीपशिखा नागपाल


अभिनेत्री दीपशिखाने 1997 साली मल्याळम आणि हिंदी सिनेमातील अभिनेता जीत उपेंद्र लग्न केलं. लग्नानंतर दीपशिखाला वेदिका आणि विवान अशी दोन मुलं झाली. मात्र लग्नाला दहा वर्ष झाली असताना 2007 साली दीपशिखा आणि जीत उपेंद्र यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर दीपशिखाला मुलांची कस्टडी मिळाली. तेव्हापासून दीपशिखानं वेदिका आणि विवान यांचा एकटीनेच सांभाळ केला. 2012 साली ये दूरियाँ मालिकेतील कोस्टार असलेल्या केशव अरोरासह दीपशिखानं लग्न केलं.
 
किरण खेर


 
प्रसिद्ध अभिनेत्री आणि इंडियाज गॉट टॅलेंट या रियालिटी शोच्या जज म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या किरण खेर या ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या पत्नी आहेत. गेल्या 32 वर्षांपासून या दोघांचा एकत्र संसार सुरु आहे. किरण खेर यांचं अनुपम यांच्यासह हे दुसरं लग्न आहे. आधी त्यांनी गौतम बेरीसह पहिलं लग्न केलं होतं. किरण आणि गौतम यांचा एक मुलगा असून त्याचं नाव सिकंदर असं आहे. अनुपम खेर यांच्याशी असलेल्या अफेअरमुळे किरण यांनी गौतम बेरीपासून काडीमोड घेतला असं बोललं जातं. सिकंदर हा अनुपम खेर यांचा सख्खा लेक नसला तरी सावत्रपणाची भावना त्यांनी त्याला कधीही येऊ दिली नाही. 

Web Title: These are TV actresses who took responsibility for children as a single mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.