या पाच अभिनेत्यांनी नाकारली 'तारक मेहता'मधील 'जेठालाल'ची भूमिका, जाणून घ्या कोण आहेत ते?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:46 PM2024-05-30T15:46:33+5:302024-05-30T15:49:01+5:30
Tarak Mehta Ka Ulta Chashma : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालाल. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशीने साकारली आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांमध्ये 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेचा उल्लेख होतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे जेठालालचं. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी(Dilip Joshi)ने साकारली आहे. या भूमिकेतून त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली. मात्र तुम्हाला माहिती आहे का, जेठालालच्या भूमिकेसाठी दिलीप जोशी पहिली पसंती नव्हते. दिलीप जोशीच्या आधी कमीत कमी पाच अभिनेत्यांनी जेठालालची भूमिका करण्यासाठी नकार दिला होता.
राजपाल यादव
जेठालालच्या भूमिकेसाठी सर्वात आधी राजपाल यादवची निवड करण्यात आली होती. त्याच्या कॉमेडीचा अचूक टायमिंग आणि पंच लाइनमुळे निर्मात्यांना त्याने ही भूमिका करावी असे वाटत होते. मात्र त्यावेळी राजपाल यादवला छोट्या पडद्यावर काम करायचे नव्हते आणि त्याला बॉलिवूडवर आपले लक्ष केंद्रीत करायचे होते. त्यामुळे त्याने ही भूमिका नाकारली.
अली असगर
कपिल शर्मा शोमध्ये दादीच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विनोदीवीर अली असगरला जेठालालच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. अली असगरने अनेक लोकप्रिय मालिकांसाठी काम केले आहे, जसे की कहानी घर घर की आणि कुटुंब. यासोबतच त्याने कॉमेडी सर्कसमध्येही काम केले. मात्र त्याने जेठालाल बनण्यास नकार दिला.
किकु शारदा
कपिल शर्मा शोमध्ये बच्चा यादवच्या भूमिकेतून किकु शारदा लोकप्रिय झाला. त्याने बऱ्याच सिनेमांसोबत मालिकेत काम केले आहे. मात्र त्यानेदेखील जेठालालची भूमिका नाकारली.
एहसान कुरैशी
तारक मेहताचे निर्माते जेठालालच्या भूमिकेसाठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कॉमेडीयन एहसान कुरैशीकडे गेले होते. त्याने द ग्रेट इंडियन लाफ्टर शोमधून लोकांना खळखळून हसविले. कुरैशीचा देखील जेठालालची भूमिका नाकारणाऱ्या अभिनेत्यांमध्ये समावेश आहे.
योगेश त्रिपाठी
भाभीजी घर पर है मालिकेत हप्पू सिंहची भूमिका साकारणारा योगेश त्रिपाठीची जेठालालची भूमिका करण्यास काहीही हरकत नव्हती. मात्र त्याच्याकडे आधीपासून खूप काम नव्हते आणि त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंट्समुळे तो जेठालालची भूमिका करू शकला नाही.