मेरे साईच्या सेटवर 'या' जुन्या मित्रांची झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 06:19 AM2018-04-14T06:19:05+5:302018-04-14T11:49:05+5:30

बर्‍याच काळानंतर आपल्या गावचा कोणी मित्र भेटणे ही खूप आनंददायक गोष्ट असते. साई बाबा मालिकेत साईंची भूमिका करणार्‍या अबीर ...

These 'old friends' gift to my sai set | मेरे साईच्या सेटवर 'या' जुन्या मित्रांची झाली भेट

मेरे साईच्या सेटवर 'या' जुन्या मित्रांची झाली भेट

googlenewsNext
्‍याच काळानंतर आपल्या गावचा कोणी मित्र भेटणे ही खूप आनंददायक गोष्ट असते. साई बाबा मालिकेत साईंची भूमिका करणार्‍या अबीर सूफीला अलीकडे असाच सुखद आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा, त्याला समजले की त्याचा जुना मित्र तरुण खन्ना त्याच्या मालिकेत रत्नाकरची भूमिका करणार आहे. दोघे एकमेकांना आत्मियतेने भेटले आणि त्यांनी गत काळाच्या आठवणी काढल्या. अबीर आणि तरुण हे सुमारे 2-3 वर्षे मित्र होते आणि त्यांची अचानक भेट ही एक आनंददायक गोष्ट होती. दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या आणि नावाबांच्या शहरात काढलेले आपले फोटो पाहताना दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रीकरणादरम्यान विश्रांतीच्या वेळेत ते एकत्रच असतात आणि ते जेवतात देखील एकत्रच. तरुण जेव्हा लखनौला जायचा तेव्हा ते दोघे एकत्र मजेत वेळ घालवत असत, विविध ठिकाणी फिरत आणि तिकडच्या चटपटीत चाटवर ताव मारत असत. अबीर जेव्हा मुंबईला येई, तेव्हा तरुणसाठी खास लखनवी कुर्ता आणि खास कलाकृती घेऊन येईल.

अबीर सूफीने पुष्टी करत सांगितले, ”तरुण आणि मी खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो. मी त्याला माझ्या गावात म्हणजे लखनौमध्ये भेटलो होतो. तो त्यावेळी देखील भारतीय टेलिव्हिजनवरील एक सुपरिचित झालेला चेहरा होता. कर्मधर्म संयोगाने आम्ही आता मेरे साई मध्ये एकत्र काम करत आहोत. खूप वर्षांनंतर मित्राला भेटणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची भावना खूप सुंदर आहे. तो सेट्सवर असल्यामुळे मला असेच वाटत राहते की, मी माझ्या गावाला, लखनौला माझ्या मित्रांसोबत आहे.”

तरुण खन्ना म्हणाला, “मेरे साईचा एक भाग होण्याचा आनंद खूप मोठा आहे. मला जेव्हा मेरे साई मध्ये रत्नाकरची भूमिका करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी सेट्सवर अबीरला आश्चर्याचा धक्का देण्याचे ठरवले. शिवाय माझी पत्नी लखनौची असल्यामुळे मी बर्‍याचदा तिकडे जातो. यापूर्वी मी टेलिव्हिजनवर पौराणिक मालिकांमध्ये काम करून अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. रत्नाकरची व्यक्तिरेखा त्यापेक्षा वेगळी आहे कारण तो परदेशातून परतलेला एक धनाढ्य व्यापारी आहे. प्रत्यक्षात जो माझा चांगला मित्र आहे त्याच्याशी पडद्यावर दुष्टतेने वागणे काहीसे विचित्र वाटते. मी अबीरला साईंची भूमिका करताना पहिले आहे आणि तो ती अप्रतिम करतो आहे. मेरे साईच्या संपूर्ण क्रू सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान आहे.”
या मालिकेच्या येत्या भागांमध्ये रत्नाकर हा धनाढ्य व्यापारी परदेशातून परतला आहे आणि साई बाबांची ‘द्वारकामाई’ घेण्याचा त्याचा विचार आहे. त्याचा दुष्ट हेतु सफळ होईल का? हे आपल्याला लवकरच कळेल. 

Web Title: These 'old friends' gift to my sai set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.