ग्रहण या मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 06:33 AM2018-04-13T06:33:39+5:302018-04-13T12:03:39+5:30

वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण ...

These things will be seen in the special part of the Eclipse series | ग्रहण या मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील या गोष्टी

ग्रहण या मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील या गोष्टी

googlenewsNext
>वैविध्यपूर्ण मालिका सादर करून झी मराठी या वाहिनीने महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्याच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांचा पसंतीस पडत आहे.
निरंजन, मोनू आणि लक्ष्मी यांच्यात रमा तिचे हरवलेले कुटुंबीय शोधतेय आणि त्यांना आपल्या जवळ कसं करता येईल यासाठी ती धडपड करताना दिसतेय. येत्या रविवारी ग्रहण मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागात रमा तिचे हरवलेलं कुटुंब पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये ज्यांनी येणाचा प्रयत्न केला त्यांचा रमाने काटा काढण्याचे ठरवले आहे. मालिकेविषयी बोलताना रमा म्हणजेच अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, "गूढ कथांचे आकर्षण मला पहिल्यापासूनच आहे. सुरुवातीला जेव्हा मला मालिकेबाबत विचारण्यात आले, तेव्हा मी नाही म्हणण्याच्या बेतात होते, पण जेव्हापटकथा वाचली... मला ती प्रचंड आवडली आणि ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही संपूर्ण मालिका फक्त १०० भागांचच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येण्याची शक्यता खूप कमी आहे. जेव्हा मी ही मालिका करण्याचे ठरवले, तेव्हा सर्वप्रथम धारपांची 'ग्रहण' ही कादंबरी संपूर्ण वाचून काढली. आम्ही मालिकेचा गाभा ही कादंबरीच ठेवली असली तरी कथानकात बरेच बदल केले आहेत. व्यक्तिरेखांची नावे देखील बदलली आहेत. मला खात्री आहे एका नंतर एक येणाऱ्या भागातून उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल आणि त्यासाठी हा एक तासाचा विशेष भाग पाहायला विसरू नका"  
रमा तिचे हरवलेले कुटुंब पूर्ण करू शकेल का? तिच्या आड येणाऱ्या लोकांचा ती काटा कसा काढेल? याची उत्तरे प्रेक्षकांना रविवार १५ एप्रिलला रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर मिळणार आहेत. हा भाग प्रेक्षकांना आवडेल अशी मालिकेच्या टीमला खात्री आहे. 
 
 

Web Title: These things will be seen in the special part of the Eclipse series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.