एका लोकप्रिय स्टारकिडमुळे एरिकाला केलं सिनेमातून आऊट; 'त्या' प्रकारानंतर अभिनेत्रीने धरली मालिकांची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:05 PM2024-06-25T12:05:53+5:302024-06-25T12:06:20+5:30

Erica Fernandes: सुरुवातीच्या काळात या अभिनेत्रीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु, एका स्टारकिडमुळे तिच्या हातून एक मोठा सिनेमा गेला. त्यानंतर तिने तिचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला.

these-tv-actress-career-struggle-was-replaced-in-films-by-star-kids | एका लोकप्रिय स्टारकिडमुळे एरिकाला केलं सिनेमातून आऊट; 'त्या' प्रकारानंतर अभिनेत्रीने धरली मालिकांची वाट

एका लोकप्रिय स्टारकिडमुळे एरिकाला केलं सिनेमातून आऊट; 'त्या' प्रकारानंतर अभिनेत्रीने धरली मालिकांची वाट

इंडस्ट्रीमध्ये आऊटसाईडर आणि स्टारकिड्स यांच्यात कायमच तुलना केली जाते. यात काही असे कलाकार आहेत ज्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, या कलाकारांच्या वाट्याला अनेक चढउतार आले. इतकंच नाही तर काही जणांना  चक्क सिनेमातून बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. सुरुवातीच्या काळात या अभिनेत्रीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. परंतु, एका स्टारकिडमुळे तिच्या हातून एक मोठा सिनेमा गेला. त्यानंतर तिने तिचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला.

नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती अभिनेत्री एरिका फर्नांडिस (Erica Fernandes) हिची. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर एरिकाने कलाविश्वात अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सध्या एरिका छोट्या पडद्यावर नशीब आजमावत आहे. एरिकाने साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. या इंडस्ट्रीतील तिला आलेला अनुभव तिने नुकताच एका मुलाखतीमध्ये सांगितला. एका स्टारकिडमुळे तिला चक्क सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

अलिकडेच एरिकाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला.  "मी एका साऊथ सिनेमात काम करत होते. या सिनेमाचं मी २-३ दिवस शूटही केलं होतं. मात्र, अचानक मला या सिनेमातून रिप्लेस केलं. विशेष म्हणजे ही गोष्ट सुद्धा मला मीडियाच्या माध्यमातून कळली", असं एरिका म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एक वेळ अशीही आली होती जेव्हा मी ऑडिशनसाठी गेले होते आणि जवळपास माझी निवड झाली होती. पण, त्यानंतर अचानक एका स्टार किडमुळे मला रिप्लेस करण्यात आलं. या प्रकारानंतर मी सिनेमा सोडून टीव्ही क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. लोकांना प्रश्न पडतो मी सिनेमा सोडून मालिका करायला कशी काय सुरुवात केली. पण, मला याचा काहीही फरक पडत नाही. माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे. आणि, मी हे गर्वाने सांगू शकते की मी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम केलं तरी ते उत्तमच करेन."

दरम्यान, एरिकाने 2013 मध्ये तामिळ चित्रपट Ainthu Ainthu Ainthu ने चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने साउथ चित्रपटात 2013 ते 2017 पर्यंत काम केलं. एरिकाने Ninnindale, बबलू हॅप्पी है, Virattu, Galipatam या सिनेमांमध्ये काम केलं आहे. २०१८ मध्ये एरिकाने एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी' या मालिकेत काम केलं आहे.

Web Title: these-tv-actress-career-struggle-was-replaced-in-films-by-star-kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.