‘आप के आ जाने से’मध्ये दिसणार दोन भिन्न कुटुंबातील गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 05:56 AM2018-01-08T05:56:04+5:302018-01-12T15:52:54+5:30

आपली वृध्द माता आणि 15 वर्षांची मुलगी यांची काळजी घेणारी वेदिका माथूर ही 42 वर्षांची स्वतंत्र बाण्याची आणि कणखर ...

Things from two different families will appear in 'From Your Being' | ‘आप के आ जाने से’मध्ये दिसणार दोन भिन्न कुटुंबातील गोष्टी

‘आप के आ जाने से’मध्ये दिसणार दोन भिन्न कुटुंबातील गोष्टी

googlenewsNext
ली वृध्द माता आणि 15 वर्षांची मुलगी यांची काळजी घेणारी वेदिका माथूर ही 42 वर्षांची स्वतंत्र बाण्याची आणि कणखर मनाची माता असते. या दोघांचे संगोपन ती एकटीच करीत असते. साहिल अगरवाल हा 24 वर्षांचा जीवनावर प्रेम करणारा खुशालचेंडू तरूण असतो. साहिल आपल्याच मस्तीत इतका मश्गुल झालेला असतो की इतरांच्या मते त्याला जीवनात कसलेही ध्येय नसते किंवा कोणतेही लक्ष्यही नसते. परंतु या दोघांमध्ये काही समान धागा आहे का? कदाचित नाही; पण एकमेकांच्या प्रेमात पडणे हे त्यांचे विधिलिखित बनले आहे. ‘आप के आ जाने से’ ही ‘झी टीव्ही’वरील आगामी मालिका म्हणजे अगदी अलग प्रकारची रोमँटिक कथा आहे. यात प्रेमात पडणारे दोन जीव हे वय, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि जीवनातील टप्पे यांच्या पलीकडे जातात. ‘आज लिखेंगे कल’ या आपल्या धोरणास अनुसरून निर्मिती केलेल्या या मालिकेतून एक प्रश्न विचारला जात आहे- प्रेमात पडण्यासाठी परवान्याची गरज असते का? एकमेकांवर प्रेम करण्यासाठी दोन प्रेमीजनांना समाजाच्या मान्यतेची गरज लागते का? कोणी कोणावर प्रेम करावे यासाठी जात, वंश, आर्थिक पार्श्वभूमी आणि वयोमर्यादा या निकषांची गरज असते का? ‘बोधी ट्री प्रॉडक्शन्स’ची निर्मिती असलेली ‘आप के आ जाने से’ ही मालिका 15 जानेवारीपासून  ‘झी टीव्ही’वरून प्रसारित केली जाणार आहे.

या मालिकेत अनेक नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत असून वेदिका माथूरची भूमिका सुहासी धामी आणि साहिल अगरवालची भूमिका करण जोटवाणी साकारणार आहे. कानपूरमध्ये घडणार्‍या ‘आप के आ जाने से’  या मालिकेच्या कथानकात भिन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या आणि वेगवेगळ्या वयोगटातील वेदिका आणि साहिल या दोन व्यक्ती सर्व अडचणींना तोंड देत एकमेकांच्या प्रेमात पडतात. जेव्हा या दोघांची आयुष्ये एकमेकांमध्ये गुरफटतात, तेव्हा वेदिका आणि साहिल यांनी स्वत:वर घालून घेतलेल्या बंधनांना तोडावे लागते आणि आपल्याला दुसर्‍्याबद्दल मनापासून प्रेम वाटते, ही गोष्ट कबूल करावी लागते. आपण एकमेकांवर प्रेम करतो, ही गोष्ट मान्य करण्याचे धैर्य ते गोळा करतील? ‘लोक काय म्हणतील?’ या निरंतर प्रश्नाला सामोरे जाताना ते समाजमान्यतेच्या बंदीच्या आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाच्या विरोधात उभे ठाकतील काय? हे कळण्यासाठी आपल्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. 
 

Web Title: Things from two different families will appear in 'From Your Being'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.