'ठिपक्यांची रांगोळी' मधील सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 06:11 PM2022-10-06T18:11:24+5:302022-10-06T18:19:09+5:30

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील रिअल लाईफ कपलनं महागडी कार खरेदी केली आहे. त्यांच्यावर सहकलाकारांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.

'Thipkyaya Rangoli' fame Leena Bhagwat and Mangesh Kadam bought an expensive car | 'ठिपक्यांची रांगोळी' मधील सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

'ठिपक्यांची रांगोळी' मधील सेलिब्रिटी जोडप्याने खरेदी केली महागडी कार, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

googlenewsNext

'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात.

या मालिकेमध्ये लीना कदम आणि मंगेश कदम ही जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही जोडी खऱ्या आयुष्यातही पती-पत्नी आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर या जोडीने आलिशान कार खरेदी केली आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सेलिब्रेटीहींसह चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. 

 १९९६ साली अधांतर हे पहिलं व्यवसायिक नाटक त्यांनी साकारलं. त्याअगोदर हाच खेळ उद्या पुन्हा या नाटकामुळे दिग्दर्शक, अभिनेते मंगेश कदम सोबत त्यांची चांगली ओळख झाली.  त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत कमी करत असताना एक दिवस मालिकेतून सुट्टी काढून २०१४ साली या दोघांनी प्रेमविवाह केला. मंगेश कदम यांचं दिग्दर्शन क्षेत्रात एक मोठं नाव होतं.  होणार सून मी ह्या घरची, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिकांमधुन त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. 
 

Web Title: 'Thipkyaya Rangoli' fame Leena Bhagwat and Mangesh Kadam bought an expensive car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.