सहकुटुंब सहपरिवारमधील या अभिनेत्यानं सोडली मालिका; सरिता वहिनी म्हणाली- इतका जीव लावतोस की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:57 IST2022-12-16T15:53:20+5:302022-12-16T15:57:59+5:30
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील प्रत्येक कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. आता या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मालिका सोडली आहे.

सहकुटुंब सहपरिवारमधील या अभिनेत्यानं सोडली मालिका; सरिता वहिनी म्हणाली- इतका जीव लावतोस की...
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे सहकुटुंब सहपरिवार. उत्तम कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. आतापर्यंत या मालिकेत मोरे कुटुंबावर अनेक संकट आल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या सगळ्या संकटांवर संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे यशस्वीरित्या मात केली. या मलिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने नुकतीच मालिका सोडली आहे. यानंतर त्याच्यासाठी
सरिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकरने एक खास पोस्ट केली आहे.
सहकुटुंब सहपरिवार मालिकेत वैभवची भूमिका साकारणारा अभिनेता अमेय बर्वेनं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतून अमेय घराघरात पोहचला आणि लोकप्रिय झाला. सरिता वहिनी म्हणजेच नंदिताने अमेयसाठी लिहिलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. पोस्ट सोबत तिनं काही फोटो ही शेअर केले आहेत.
नंदिताची पोस्ट
अम्या....हक्काने भांडणारा, हट्ट करणारा, मस्का मारणारा, खोड्या काढणारा..... जगातला आगाऊ माणूस आहेस तू.
जिकडे जाशील तिकडे माणसं जोडतोस, इतका जीव लावतोस .... की तू जाताना लोकं नुसती रडारड करून हैराण.
तुझी style, तुझा attitude, तुझा वावर सगळ्यांना हवाहवासा वाटणारा.तुझा sense of humour इतका weird की तुझ्यावर कितीही राग आला तरी समोरच्याला हसायला भाग पाडणारा.
किती सवय लावली आहेस यार तू आम्हा सगळ्यांना. लॉकडाऊन, कोविड सण, वाढदिवस, ब्रेकअप, गेट टू गेदर, वाद, टीआरपी, नाईट ड्युटी, चांगले दिवस, वाईट दिवस आपण सर्वकाही एकत्र साजरे केले. आता तुझ्याशिवाय खूप कठीण जाईल. तू कुटुंबातील सर्वात सक्षम सदस्य आहेस.'
किती सवय लावलीयस यार तू आम्हा सगळ्यांना. लॉकडाऊन, कोविड सण, वाढदिवस, ब्रेकअप, गेट टू गेदर, वाद, टीआरपी, नाईट ड्युटी, चांगले दिवस, वाईट दिवस आपण सर्वकाही एकत्र साजरे केले.आता तुझ्याशिवाय खूप कठीण जाईल. तू कुटुंबातील एक महत्वाचा भाग आहेस आणि नेहमीच राहशील.
हम तुम्हे भुला दे ये मुमकीन नहीं और तुम हमें भुल जाओ, ये हम होने देंगे नहींजा भिडू जी ले अपनी जिंदगी. जिथं तू जाशील तिथं तू कायम चमकत राहशील. तुझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कर. तुझ्यात असलेली चमक कायम ठेव. ख़ुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले ख़ुदा बंदे से ख़ुद पूछे बता तेरी रज़ा क्या है!!! तुला कायम खूप खूप प्रेम, तुझी खूप आठवण येईल. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.'