'मुरांबा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, तिच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 07:00 AM2023-05-21T07:00:00+5:302023-05-21T07:00:00+5:30
Muramba : मुरांबा या मालिकेने नुकताच ४०० एपिसोडचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. मात्र आता या मालिकेतून एक अभिनेत्री बाहेर पडली आहे.
स्टार प्रवाहवरील मुरांबा (Muramba) या मालिकेने नुकताच ४०० एपिसोडचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्यानेच हे यश त्यांनी गाठले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शशांक केतकर गायब आहे. सध्या तो आपल्या नवीन प्रोजेक्टच्या कामासाठी लंडनला गेला आहे. त्याचमुळे तो मालिकेत दिसत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मालिकेची जबाबदारी रमा आणि सहकलाकारांवर सोपवण्यात आलेली आहे. अशातच आता मालिकेत आरतीची भूमिका निभावणाऱ्या शाश्वती पिंपळीकर (Shahvati Pimpalikar) हिने एक्झिट घेतली आहे. त्यामुळे शाश्वतीच्या जागी अभिनेत्री काजल काटे दिसणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर काजलने संकर्षण कऱ्हाडेच्या तू म्हणशील तसं या नाटकातून काम केले. आता पुन्हा एकदा काजल मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शाश्वतीने मालिकेतून एक्झिट का घेतली याचे कारण शाश्वतीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाखातर तिने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणाली की, गेल्या दोन दिवसात मला आलेले सर्व मेसेज आणि DM पाहून खूप भारावून गेले. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट कधी ना कधी व्हायचाच आहे. माझ्या प्रवासासाठी आरती मुकादम सारखेच आहे! गेल्या दीड वर्षात तुम्हा सर्वांनी मला खूप प्रेम आणि प्रोत्साहन दिले हे एक रोलरकोस्टर ठरले आहे.
आभार मानत ती म्हणाली की, धन्यवाद स्टार प्रवाह, मुरंबा सर्वेसर्वा, शोभना नायर हि अद्भुत सनदी दिल्याबद्दल. मला आरती मुकादम म्हणून तयार करण्यात मदत केल्याबद्दल विघ्नेशचे धन्यवाद! या संपूर्ण प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल सुशांत शशिकांत धन्यवाद. जॉय सर, अमीर सर, गुंजन सर, दिग्दर्शन टीम, सर्व तांत्रिक टीम, मेकअप टीम, स्पॉट टीम आणि अर्थातच सर्व कलाकारांचे आभार. प्रतिमा कुलकर्णी, सुलेखा तळवलकर, शशांक केतकर, स्मिता शेवाळे, शिवानी मुंढेकर, निशाणी परुळे, पूर्णिमा अहिरे, आशुतोष वाडेकर. नेहा निमगूळकर, अभिजित चव्हाण, इरावती नाडगौडा, विश्वास नवरे आणि शेवटचे पण निश्चितच खूप महत्वाचे आशिष जोशी. माझ्या आरतीला अप्रतिम अभिला सुंदर सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! ही भूमिका साकारण्यासाठी मी यशस्वी झाले याचे कारण फक्त तुझ्यामुळेच. मी आधीच तुम्हाला सर्वात जास्त मिस करत आहे! ऑल द बेस्ट काजल काटे, मला माहित आहे की तुम्ही व्यक्तिरेखेसह एक अद्भुत काम कराल. चूक भूल द्यावी घ्यावी.