‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून ही अभिनेत्री घेणार ब्रेक, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 01:02 PM2022-08-09T13:02:19+5:302022-08-09T13:09:38+5:30
Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
छोट्या पडद्यावर काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेल्या 'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात.
मालिकेत अप्पू काही दिवसांपूर्वी कानिटकरांचं घर सोडून गेली होती, ती आता परतली आहे. पण अप्पू आता शंशाकमध्ये पुन्हा काही तरी बिनसलं आहे. आता या मालिकेतून एक महत्त्वाची अभिनेत्री ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर येते आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अप्पूची भूमिका साकारणारी ज्ञानदा रामतीर्थकर आहे. ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठीचा लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. ज्ञानदा ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा शहरातली आहे . पुण्यात कॉलेजमध्ये शिकत असताना ज्ञानदाचे रंगभूमीवर पदार्पण झाले. अभिनयाची आवड जोपासत असताना कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून तिला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.
ज्ञानदा कोणत्याही सिनेमात किंवा नव्या मालिकेत काम करणार नसून सिक्रेट ऑफ गावस्कर या नव्या वेब सिरीज मध्ये काम करणार आहे. या वेब सिरीज चे पहिले पोस्टर समोर आले आहे. या वेब सिरीजच्या प्रमोशन आणि इतर गोष्टींमुळे टिपक्याची रांगोळी मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक ज्ञानदा घेणार असल्याचे कळतंय.
जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे, शादी मुबारक या मराठी आणि हिंदी मालिकेत ज्ञानदा झळकली. तू इथे जवळी रहा, प्रेमाची आरती या गाण्यातूनही ती प्रेक्षकांसमोर आली होती.‘धुरळा’ या गाजलेल्या चित्रपटातही ज्ञानदा महत्वाची भूमिका साकारताना दिसली. ‘दोस्ती दिल धोका’ हा तेलगू चित्रपटही तिने साकारला आहे. '